आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत वहिनीवर दीराने केली बळजबरी, शेजारच्या रुमध्ये होते सासू-सासरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारशरीफ (बिहार) - हुंडा मिळत नाही तेव्हा सख्ख्या भावाला स्वतःच्या पत्नीवर बळजबरी करण्यास सांगून त्या रात्री पती फरार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. या दुष्कर्माला सासू-सासऱ्यांची मुक संमती होती. मी मदतीसाठी ओरडत होते मात्र शेजारच्या रुममध्ये असूनही सासू-सासरे आले नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.
 
हुंडाबळीची येथे एक वेगळीच केस समोर आली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पतीच्या संमतीने आणि सासू-सासऱ्यांसमोर दीराने वहिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दुष्कर्माची तक्रार देण्यासाठी महिला पोलिसांत गेली तर तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. त्यानंतर महिलेने बुधवारी कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टाने महिलेची तक्रार नोंदवून तपासाचे आदेश दिले आहेत. 
 
काय आहे प्रकरण 
- ही घटना 10 डिसेंबरच्या रात्रीची आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2016 मध्ये विवाहितेला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी माहेरी पाठवून दिले होते. 
- त्यानंतर महिलेने पती, सासू, सासरा यांना हुंड्यासाठी छळ केली जात असल्याची नोटीस पाठवली. यानंतर सासरच्या लोकांनी महिलेची समजूत काढली. सर्वकाही सुरळीत होईल असे आश्वासन दिले आणि तिला घरी घेऊन गेले.
- सासरच्या लोकांवर आरोप आहे की ते महिलेकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होते. महिला माहेराहून पाच लाख रुपये आणू शकत नाही असे काळाल्यानंतर दीराने विवाहितेवर बलात्कार केला.
- तेल्हाडी येथील मनोहर गावातील पीडित महिलेने दीर पवनकुमारसह पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 
 
पोलिस काय म्हणाले... 
- पीडितेने महिला पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. 
- महिलेवर बलात्कार आणि हुंड्यासाठी छळाचा आरोप दीर, पती आणि सासू, सासरा यांच्यावर आहे. 
- पोलिस म्हणाले, तपास सुरु असून जे तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 
 
(सर्व फोटो स्टोरी प्रेझेंटेशनसाठी वापरण्यात आले आहे)
 
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या काय आहे प्रकरण... 
बातम्या आणखी आहेत...