आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर-वहिणी मध्ये अडकलेली Mystery, पतीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश आणि लता यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. - Divya Marathi
दिनेश आणि लता यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते.
जोधपूर (राजस्थान) - एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या आत्महत्येचा गुंता वाढतच चालला आहे. आता मृताच्या पत्नीने सासरची मंडळी आणि विशेषतः दीरावर खळबळजनक आरोप केले आहेत. प्रॉपर्टी बळकावण्यासाठी सासरच्या लोकांनी आणि दीराने तिच्या पतीला इस्त्रीचे चटके देऊन सुसाइड नोट लिहून घेतली आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होत आहे.

वाचा मृताच्या पत्नीने दीरावर कोणते आरोप केले...
> मृत सॉफ्टवेअर इंजिनियर दिनेशचा भाऊ विजयने याआधी वहिणी लक्ष्मी उर्फ लतावर आरोप केला होता की तिने सर्वांना हुंडाबळीच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 15 लाख रुपयांची डिमांड केली होती.
> विजयचा आरोप आहे की लक्ष्मीने पैशांची डिमांड केल्यामुळेच भावाने आत्महत्या केली.

महिलेच्या तक्रारीनंतर निर्माण झाले ट्विस्ट
> पोलिस अधिकारी गणपतलाल यांनी सांगितले, की बुधवारी लक्ष्मीने तक्रार दिली की 2010 मध्ये तिचे दिनेश मांकडसोबत लग्न झाले होते.
> लग्नानंतर दोघा नवरा-बायकोमध्ये कोणताही वाद नव्हता. मात्र दिनेशचे भाऊ विजय आणि अजयसोबत प्रॉपर्टीवरुन भांडण सुरु होते.
> मालमत्तेच्या वादातूनच त्या दोघांच्या बायकाही दिनेशला त्रास देत होत्या.

पतीला इस्त्रीचे चटके देऊन लिहून घेतली सुसाइड नोट
> 29 जून रोजी जेव्हा लक्ष्मी तिच्या माहेरी होती तेव्हा सासरच्या लोकांनी तिच्या पतीला इस्त्रीचे चटके देऊन सुसाइड नोट लिहून घेतली आणि त्यात तिचे नाव टाकायला सांगितले.
> त्यानंतर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या सर्व त्रासाने वैतागून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप लक्ष्मीने केला आहे.
> लक्ष्मीचा दावा आहे की तिचा पती आत्महत्या करु शकत नाही. त्याच्या आत्महत्येवर तिला शंका आहे. पोलिसांनी मृत दिनेशचा भाऊ विजयकुमार शर्मा, त्याची पत्नी दीपिका, दुसरा भाऊ अजय शर्मा व त्याची पत्नी अंजु यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनियरची सुसाइड नोट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...