आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी केले लव्ह मॅरेज, बायको 39ची होताच पतीने केली 'ही' मागणी, म्हणाला- ...तर जीवच घेईन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीताला नवऱ्याने घटस्फोट दे अन्यथा जीवे मारीन अशी धमकी दिली आहे. - Divya Marathi
संगीताला नवऱ्याने घटस्फोट दे अन्यथा जीवे मारीन अशी धमकी दिली आहे.
ग्वाल्हेर - तीन वर्षांपूर्वी PWD इंजिनिअरने दोन वर्षे मोठ्या महिलेशी लव्ह मॅरेजचा निर्णय घेतला. सजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी हे स्वीकारून धुमधडाक्यात लग्न लावले. पतीच्या आयुष्यात आता दुसरी तरुणी आली आहे, आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. म्हणूनच पती धमकी देतोय की, घटस्फोट दे अन्यथा संधी मिळताच तुझा खून करीन. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, आता तिचे वय 39 झाले आहे, आता या वयात ती कुठे जाईल.
 
असे आहे प्रकरण...
- 2014 मध्ये PWD इंजिनिअर अंकुर आणि संगीता श्रीवास्तव यांची तीन वर्षांपूर्वी भेट झाली होती. संगीता ही अंकुरहून 2 वर्षांनी मोठी होती, तरीही अंकुरने तिला प्रपोज केल्याने संगीता राजी झाली होती.
- दोघेही सजातीय असल्याने कुटुंबीयांनी या लव्ह मॅरेजला अरेंज केले होते. शहराच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये 2014 मध्ये दोघांचे धूमधडाक्यात लग्नही लावण्यात आले. लग्नानंतर दोन वर्षे सर्वकाही सुरळीत होते.
- यानंतर अंकुरने तिला मारहाण सुरू केली.
- संगीताला नवऱ्याच्या अचानक बदललेल्या वागण्याचा अंदाज आला नाही. यानंतर कळले की, अंकुरच्या जीवनात दुसरी कोणीतरी आली आहे. आणि अंकुरला तिला घटस्फोट द्यायचा आहे. तर संगीताचा म्हणणे आहे की, 39 वर्षे वयात नवऱ्याला घटस्फोट दिल्यावर कुठे जाऊ?
 
घटस्फोटाला नकार देताच पतीने दिली जिवे मारण्याची धमकी
- घटस्फोट द्यायला नकार दिल्यानंतर अंकुर आणि त्याच्या नातेवाइक संगीताला धमकावत आहेत. ते दबाव देत आहेत की, घटस्फोट दिला नाही तर संधी मिळताच संगीताला जिवे मारून टाकू.
- नवरा आणि सासरच्या लोकांचा टॉर्चर आणि धमक्यांनी परेशान होऊन संगीताने एसपी डॉ. आशिष कुमार यांना नवऱ्याची तक्रार करत तिला वाचवण्याची विनंती केली आहे.
- एसपींनी महिला सेल प्रभारी अनिता मिश्रा यांना ही केस दिली असून यासंबंधी शहराचे एसीपी अभिषेक तिवारी म्हणाले की, तक्रार मिळताच तपास सुरू केला आहे. संगीताच्या केसाला धक्का लागू देणार नाही. तिची पूर्ण सुरक्षा केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...