हैदराबाद - दलित स्कॉलर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता सुशीलकुमार समोर आला. सुशील व त्याचा भाऊ विष्णु यांच्यासह केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, कुलगुरु अप्पा राव यांच्यावर रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह रोहितच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले सर्व लोक बुधवारपासून माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देऊ लागले आहेत. त्याच मालिकेत गुरुवारी सुशील समोर आला. एनडीटीव्हीशी बोलताना तो म्हणाला, मी अंडरग्राउंड झाला नव्हतो. रोहितची बातमी कळाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
आणखी काय म्हणाला सुशीलकुमार
- रोहित बद्दल सुशील म्हणाला, एवढ्या सहजा-सहजी आत्महत्या करेल असा रोहित नव्हता. आम्हाला कळत नाही की त्याने एवढे मोठे पाऊल कसे उचलले.
- त्याने आत्महत्या का केली, याचे आम्हाला उत्तर पाहिजे. या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. दोषिंना शिक्षा झाली पाहिजे.
- जेव्हा तो डिप्रेशनमध्ये गेला तेव्हा त्याचे मित्र काय करत होते ?
- रोहित आणि त्याचे मित्र याकूब मेमनच्या फाशीचा विरोध होते, त्यासोबतच ते याकूबसाठी नमाज पठण करत होते.
- फाशीला विरोध करणे समजू शकतो, पण त्यांची 'हर घर याकूब' ही घोषणा विचार करायला लावणारी होती.
- तुम्ही त्याचे पत्र दोनशे वेळा वाचा, त्यात त्याने कोणाचेच नाव घेतलेले नाही.
- लोक सांगत आहे, की मी खोटारडा आहे. मी माझ्या ऑपरेशनबद्दल खोटे सांगितले. माझ्यासोबत एका विद्यार्थ्यासारखे कोणीच वागत नाही, असे वाटत आहे.
सुशीलवर काय आरोप आहे ?
- ऑगस्टमध्ये सुशील आणि रोहित व त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्यानंतर सुशीलने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती.
- सुशीलच्या या तक्रारीमुळे रोहितने आत्महत्या केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या तक्रारीमुळेच रोहित आणि त्याच्या चार मित्रांना निलंबित केल्याचा दावा केला जात आहे.
- दुसरीकडे डॉक्टरांनी दावा केला आहे, की रोहितला हॉस्पिटलमध्ये मारहाणीमुळे जखमी झाल्याने नव्हे तर अॅपेंडिक्सचा त्रास असल्याने दाखल करण्यात आले होते.
- त्यासोबतच केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी विद्यापीठावर दबाव आणल्यामुळेच दलित विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचाही आरोप होत आहे.
- हेच रोहितच्या मृत्यूचे कारण असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विद्यापीठात काय म्हणाले केजरीवाल
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल आज हैदराबाद विद्यापीठात पोहोचले आहेत. त्याआधी त्यांनी रोहितच्या कुटुंबाची भेट घेतली.
- विद्यापीठात केजरीवाल म्हणाले, विद्यार्थी संघटना स्थापन करणे देशद्रोही कृत्य होऊ शकत नाही.
- केजरीवाल म्हणाले, विद्यापीठाच्या चौकशी समितीने रोहित आणि त्याच्या मित्रांना निर्दोष ठरविले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री दत्तात्रेय यांनी अनेक पत्र लिहून विद्यापीठावर दबाव आणला.
- ते म्हणाले, सुशीलने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या उत्तरात विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने सुशीलचे आरोप खोटे असल्याचे शपथपत्र दिले होते.
- रजिस्ट्रारने कोर्टात सांगितले होते, की सुशीलला मारहाण झालेली नाही.
केजरींचा स्मृतींवर हल्लाबोल
- केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, स्मृती धडधडीत खोटे बोलत आहेत. त्या खोटे बोलून जातिय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या.
- भाजपचे लोक कोणाच्याही बाजूचे नाहीत. ते ना हिंदूंचे आहेत ना मुस्लिमांचे. त्यांनी कोणासाठीच काही केलेले नाही.
- भाजप सरकारने विद्यार्थ्यांसोबत वाद ओढवून घेऊ नये. विद्यार्थी तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचतील.
- केजरीवाल म्हणाले, रोहित ज्या समाजातून आला होता, तशा विद्यार्थ्यांना तर सरकारने मदत केली पाहिजे, मात्र त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.
- कुलगुरुवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे.
एससी-एसटी प्राध्यापकांची नोकरी सोडण्याची धमकी
- विद्यापीठातील एससी-एसटी विद्यार्थी आणि अधिकारी संघटनेने स्मृती इराणींचे सर्व दावे फेटाळून लावले. रोहित सह पाच विद्यार्थ्यांना हॉस्टेलसह विद्यापीठ परिसरात बंदी घालणाऱ्या समितीत दलित सदस्य असल्याचा दावा इराणी यांनी बुधवारी केला होता.
स्मृती इराणी दिशाभूल करत असल्याचा आरोप
रोहित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश देणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या उप-समितीमध्ये एक वरिष्ठ दलित प्राध्यापक असल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. मात्र, इराणी यांचे हे वक्तव्य पूर्णत: खोटे असून, या समितीमध्ये कुणीही दलित प्राध्यापक नव्हता, असे दलित आणि आदिवासी प्राध्यापकांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, का केली रोहितने आत्महत्या