आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Woman Starts \'Rice Bucket Challenge\' To Help The Poor

भारतीय महिलेचे \'आइस बकेट\' ला \'राइस बकेट\' ने प्रतिउत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैद्राबाद - मागील अनेक दिवसांपासून सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळीनी 'आइस बकेट' चॅलेंज स्विकारल्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्यापैकी प्रत्येकाने सोशल मीडियावर पाहिले आहेत. या 'आइस बकेट' ला आता हैद्राबादमधील एका महिलेने 'राइस बकेट' ने प्रतिउत्तर दिले आहे. मंजुलता कलानिधी असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे कलानिधी यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला अल्पावधितच सोशल मीडियावर भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कलानिधी यांच्या मते, समाजतील अनेक माणसांना दोन वेळेस जेवण मिळणे कठीण आहे अशा व्यक्तीना राइस बकेटमुळे फायदा होईल. त्या म्हणाल्या की, बादली भरुनच तांदूळ दिले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु थोड्या तांदळाचे दान केल्याने भुकेल्या व्यक्तीचे पोट भरु शकते.
हेतू काय ?
आपल्या संकृतीमध्ये दान करण्याला खुप महत्व आहे त्यामुळे 'आइस बकेट' ऐवजी 'राइस बकेट' ची संकल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. मंजुलता यांनी वैयक्तिक स्तरावर सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल केंद्रामध्येही त्यांचे कौतुक होत आहे.
नेमके काय आहे आइस बकेट चॅलेंज ?
मागील काही दिवसांपूर्वी ब्रिटेनमध्ये सुरु झाला. या चॅलेजमध्ये बादलीभर बर्फ अंगावर ओतून घ्यायचे आव्हाहन स्विकारायचे आणि जर ते आव्हाहन घेणे शक्य नसल्यास किंवा त्यामध्ये अपयश आल्यास एका विशिष्ट रक्कमेची देणगी 'अमयोट्राफिक लॅटरल स्क्लेरोसिस' (एएलएस) या रोगावरील संशोधनासाठी द्यायची.