आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट खेळताना छातीला चेंडू लागून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- क्रिकेट खेळताना सहा वर्षांच्या टी. वंशी कृष्णा याचा छातीवर चेंडू लागून मृत्यू झाला. कृष्णा आपल्या मित्रांसोबत टेनिस बॉलने क्रिकेट खेळत होता. तो फलंदाजाजवळ उभा होता. त्यावेळी चेंडू त्याच्या छातीवर लागला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वामशी गुरुवारी सायंकाळी वनस्थलीपुरम येथील सहारा एस्टेटमध्ये आपल्या घराजवळ क्रिकेट खेळत होता. यादरम्यान एका फलंदाजाने उचलून खेळलेला चेंडू वामशीच्या छातीला जोरात लागला. वामशी जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना वामशीची प्राणज्योत मालवली.
12 वर्षीय फलंदाजाने खेळलेला चेंडू लागून वामशीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत वामशीच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.
असा झाला होता अंकितचा मृत्यू
कोलकात्यातील साल्टलेकमध्ये क्रिकेटपटू अंकित केसरी (वय-20) सीनियर वन-डे नॉक-आउट लढतीदरम्यान 17 एप्रिलला गंभीर जखमी झाला होता. झेल घेताना अंकीत आणि सौरव मंडलमध्ये धडक झाली होती. भवानीपुर क्लब विरुद्ध ईस्ट बंगाल या लढतीदरम्यान ही दूर्घटना घडली होती.


पुढील स्लाइडवर वाचा, ऑस्ट्रेलियन फिलिप ह्यूजचा मृत्यू देखील चेंडू लागूनच...