आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रु मेंबर्सशी वाद वऱ्हाडी मंडळीला पडला महागात, पायलटने सर्वांना खाली उतरवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/हैदराबाद - विमानाने निघालेल्या वऱ्हाडी मंडळींनी क्रू मेंबर्ससोबत केलेला कथित वाद एवढा विकोपाला गेला की पायलटने हैदराबादहून टेक ऑफ करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींवर विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. हे वऱ्हाड हैदराबादहून रायपूरला निघाले होते.

काय आहे प्रकरण
इंडिगोच्या हैदराबाद-रायपूर-दिल्ली फ्लाइटने बी.सी.पिचा आणि त्यांच्या कुटुंबातील 70 सदस्य रायपूरला निघाले होते. विमानात बसल्यानंतर वऱ्हाडी मंडळीचा क्रु मेंबर्ससोबत वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला, की पायलटने वऱ्हाडी उतरत नाही तोपर्यंत विमान उड्डाण करणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे शुक्रवारी सायंकाळी 7.40 ला रायपूरला पोहोचणारे विमान उशिरा रात्री लँड झाले. वऱ्हाडी आणि क्रु मेंबर्सच्या वादामुळे रायपूरहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. काहींनी तिकीट रद्द केले.

पिचा यांनी क्रु मेंबर्ससोबत गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, इंडिगो फ्लाइटने आम्हाला उतरवून दिल्यानंतर आमचे तिकीटाचे पैसेही परत केले नाही.

व्हीआयपींनी रद्द केले तिकीट
इंडिगोचे विमान हैदराबादहून रायपूर आणि रायपूरहून पुढे दिल्लीला जाणार होते. मात्र हैदराबादला झालेल्या वादानंतर फ्लाइट रायपूरला पोहोचण्यास उशिर झाला. या विमानाने खासदार ताम्रध्वज साहू दिल्लीला जाणार होते. फ्लाइटला होत असलेल्या उशिरामुळे त्यांनी तिकीट रद्द केले. राजनंदगावचे खासदार अभिषेकसिंह पत्नी ऐश्वर्यासोबत याच फ्लाइटने दिल्लीला जाणार होते.

एअरलाइन्सने काय सांगितले
इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, शनिवारी वऱ्हाडी मंडळींना रायपूरला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी प्रवाशांना नवीन तिकीट खरेदी करावे लागतील. पूर्वीच्या तिकीटावर त्यांना प्रवास करता येणार नाही.