आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीतून येत होते विचित्र आवाज, पाहिले तर डोळे चमकताना दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या प्रकारे शिडी लावून तरसाला बाहेर काढण्यात आले. - Divya Marathi
या प्रकारे शिडी लावून तरसाला बाहेर काढण्यात आले.

सूरजपूर - जंगलातून भटकत आलेला एक तरस गावातील कोरड्या विहिरीत पडले. तिथून येणाऱ्या-जाणाऱ्या गावकऱ्यांना विचित्र आवाज ऐकू येत होते. विहिरीत वाकून पाहिल्यावर त्यांनी लागलीच वनविभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने 25 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरसाला सुखरूप बाहेर काढले.

 

असा पडला खड्ड्यात...
- ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. सुरजपूर जिल्ह्याच्या पंडोपारा गावामध्ये एका कोरड्या विहिरीत तरस पडला.
- रविवारी तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी विहिरीतून येत असलेल्या विचित्र आवाजांमुळे वाकून पाहिले असता त्यांना एक तरस आढळला. 
- पाहणाऱ्याने गावात जाऊन इतरांना माहिती दिली. नंतर तरसाला पाहण्यासाठी विहिरीवर गावकऱ्यांची भलीमोठी गर्दी जमली आणि तिथूनच वन विभागाला माहिती देण्यात आली.
- सूत्रांनुसार, विहिरीचे बांधकाम सुरू होते. आणि विहीर फक्त 30 फूट खोल होती. वनविभागाच्या टीमने गावकऱ्यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून तरस निघू शकला नाही.
- शेवटी विहिरीत शिडीच्या आधारे लोकांनी उतरून दोरीच्या जाळ्यात तरसाला अडकवले आणि मग कुठे सोमवारी सकाळी तरसाला सुखरूप बाहेर काढता आले. 
- या पूर्ण बचाव कार्यात वन विभागाला 25 हून जास्त तास लागले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...