आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादला नाकारून ह्युंदाई ग्रुपच्या‘किया मोटर्स’चा आंध्र प्रदेशशी करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती (आंध्र प्रदेश)- औरंगाबादची डीएमआयसी प्रतीक्षा करीत असलेल्या ह्युंदाई ग्रुपच्या ‘किया मोटर्स’ने अखेर आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमध्ये प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्या संदर्भात आंध्र प्रदेश सरकारशी करायच्या करारावर काल कंपनीतर्फे राजधानी अमरावती येथे स्वाक्षरी करण्यात आली. तिथे कंपनी १.१ अब्ज डालरची म्हणजे साधारण सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
 
औरंगाबाद डीएमआयसीमध्ये किया मोटर्सने प्रकल्प सुरू करावा यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे प्रयत्न केले जात होते. त्यासाठी उद्योगमंत्री सुधीर देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्वत: प्रयत्न करीत होते. कंपनीला प्रकल्पासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही सरकारने दाखवली होती. मात्र, आपल्या पुरवठादार कोरियन कंपन्यांनाही मोफत जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने कंपनीसाठी सुरू असलेले प्रयत्न थांबवले होते. ही मागणी आंध्रने मान्य केली. कंपनीच्या आसपासच या कोरियन वेंडर्सचेही प्रकल्प असतील. करारानंतर कंपनीचे अध्यक्ष हान-वू पार्क यांनी सांगितले, प्रकल्पाच्या कामाला वर्ष अखेरीस प्रारंभ होईल. प्रकल्पातून लहान एसयूव्ही व सेडान कारची निर्मिती होईल. दरवर्षी ३ लाख कार निर्मितीची क्षमता असेल. कंपनीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असेल. 
 
ह्युंडईने १९९८ मध्ये विकत घेतली किया मोटर्स : ह्युंडई कंपनीने सन १९९८ मध्ये किया मोटर्स ही कंपनी विकत घेतली. किया मोटर्सकडून क्रासओवर स्पोर्टेज, अर्बन क्रासओवर सौल, काम्पॅक्ट कार रियो आणि आप्टिमा, सेडेन्जा आणि के ९०० यांच्यासह मध्यम आकाराच्या आणि आरामदायी सेडान गाड्या तयार केल्या जातात.
 
पुढील स्लइडवर वाचा दोन वर्षांत आठ बड्या कंपन्या आैरंगाबादच्या हातून गेल्या 
बातम्या आणखी आहेत...