आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Honest About ‘baharwali’ In Biography Shatrughan Sinha

आयुष्यात अनेक मुली आल्या: शत्रुघ्न यांच्‍या चरित्रात ‘बाहरवाली’चा उल्लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- बॉलीवूडमध्ये शॉटगन म्हणून आेळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर आधारित जीवनचरित्राचा तपशील जाहीर झाला आहे. जीवनचरित्रामध्ये आपल्या अफेअरची खुलेआम चर्चा करण्यात आली आहे. करिअरमधील संघर्ष, ‘घरवाली’, ‘बाहरवाली’चा ऊहापोह असल्याची कबुली दस्तुरखुद्द शत्रूंनी दिली आहे.
‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ हे पुस्तक नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. भारती एस. प्रधान यांनी त्या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यात ७० वर्षीय अभिनेत्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. सोमवारी शत्रुघ्न सिन्हा कोलकाता लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. त्या निमित्ताने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या अफेअरबद्दलची प्रामाणिक कबुली दिली आहे. त्यामुळे रंजकताही आली, असे त्यांनी सांगितले.
आयुष्यात अनेक मुली
माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या आहेत, याची जाहीर वाच्यता मी यापूर्वी कधीही केली नव्हती. कारण त्यांंच्या सन्मानाला त्यामुळे ठेच पोहोचली असती. त्या सर्व सुखाने संसार करू लागल्या आहेत. त्यांची मुले आहेत. म्हणूनच त्यांची नावे स्पष्टपणे त्यात नमूद नसली तरी अफेअरची माहिती मात्र देण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, प्रकाशन समारंभातील काही फोटो..