आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Appreciate Mosquto Who Biting Rahul, Last One Hundred Years Mosquto Away From Gandhi Family

राहुलचे रक्त शोषणार्‍या डासांना मोदींचा सलाम, गेल्या शंभर वर्षांत गांधी कुटूंब डासांपासून दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सागर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. गांधी कुटुंबातील सदस्याचा गेल्या शंभर वर्षांत डासाशी संबंध आला नाही. त्यामुळे शहजादे (राहुल) यांना बुंदेलखंडमध्ये चावा घेणार्‍या डासांचे मी अभिनंदन करू इच्छितो, असे मोदी यांनी मध्य प्रदेशातील सभेत सांगितले. 2009 मध्ये बुंदेलखंडच्या दौर्‍यात डास चावल्याचा संदर्भ राहुल यांनी नुकत्याच झालेल्या सभेत दिला होता. त्यावर मोदी यांनी ही टिप्पणी केली आहे.
मोदी म्हणाले, विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढण्याची माझी इच्छा होती. मात्र, कॉँग्रेसला व्होट बॅँकेच्या राजकारणात रस आहे. कॉँग्रेसला जबाबदारीचे भान नाही. त्यांचे नेते घोटाळ्यात व अन्य प्रकरणात सहभागी आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गावोगावी भेट देऊन सरकारची विकासकामे सांगितली आहेत. गुनामधील सभेत मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीनंतर भाजपचे सरकार सत्तेवर येईल, अशी आशा व्यक्त केली.
मोदी वाचाळ : बब्बर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाचाळ असल्याची टीका कॉँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी केली. मोदी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करतात, महिला हेरगिरी प्रकरणी त्यांनी का मौन पाळले, अशी विचारणा बब्बर यांनी केली. मध्य प्रदेश कॉँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कॉँग्रेसला मोदींची भीती वाटत नसल्याचे सांगितले.
हेरगिरीचे भूत पिच्छा सोडेना
गुजरातमधील महिलेच्या हेरगिरी प्रकरणी कॉँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी महिलेच्या सुरक्षेसाठी पीएसओची नियुक्ती का करण्यात आली नाही, अशी विचारणा केली आहे. महिलेच्या वडिलांच्या विनंतीवरून तिला सुरक्षा पुरवण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. कोब्रापोस्ट व गुलेल पोर्टल्सनी ‘साहेबां’च्या आदेशानुसार झालेल्या हेरगिरीचा पर्दाफाश केला होता.
मोदींची पुन्हा तक्रार
सोनिया गांधी यांना आजारी संबोधणारे नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कॉँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. छत्तीसगडमधील प्रचारादरम्यान मोदी यांनी संबंधित वक्तव्य केले होते. मोदी यांच्या वक्तव्यामुळे भाजपची राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी. मोदी जाणीवपूर्वक असभ्य भाषेचा वापर करत असल्याची तक्रार कॉँग्रेसच्या विधी शाखेचे निमंत्रक के. सी. बन्सल यांनी आयोगाकडे केली आहे.