आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google सीईओ पिचाईंनी सांगितले- 20 वर्षांपूर्वी प्रथम पाहिले होते कॉम्प्यूटर, मीही कॉलेज बंक केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरगपूर - विद्यार्थ्यांनी कायम काही क्रिएटीव्ह करत राहिले पाहिजे. शिक्षण आवश्यक आहे मात्र तेच सर्वकाही नाही. रिस्क घेतली पाहिजे, काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सांगणे आहे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे. ज्या आयआयटी खरगपूरमधून पिचाई यांनी मेटालर्जिकल डिग्री संपादन केली त्याच संस्थेतील विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. गुगलचे सीईओ 23 वर्षांनंतर आपल्या कॉलेजमध्ये आले होते.
 
पिचाई म्हणाले- माझे होस्टेल आजही तसेच दिसते...
- पिचाई यांनी आयआयटी खरगपूरच्या ओपन थिएटरमध्ये विद्याऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
- 'अ जर्नी बॅक टू द पास्ट टू इन्स्पायर द फ्यूचर' असे नाव असलेल्या कार्यक्रमात पिचाई यांनी विद्याऱ्यांशी संवाद साधला. गुगलचे सीईओ काय सांगतात हे तिथे जमलले 3500 विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. यू-ट्यूबवर याचे लाइव्ह स्ट्रिमिंग होत होते.
- पिचाई म्हणाले, '20 वर्षांपूर्वी मी अमेरिकेसाठी विमानत बसलो तेव्हापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे. आज 10 कोटी लोक दरवर्षी उड्डाण करतात. मात्र माझे होस्टेल आजही तसेच दिसते, जसे 25 वर्षांपूर्वी होते.'

पिचाईंनी सांगितल्या कॉलेजच्या आठवणी- गर्लफ्रेंडला बोलावणे मोठे जिकरीचे काम 
- सुंदर पिचाई विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या कॉलेजच्या काळात रममाण झाले. आज त्यांची पत्नी असलेली अंजली त्यांना IIT मध्येच भेटल्याचे त्यांनी सांगितले.
- ते म्हणाले, 'ती माझी क्लासमेट होती. त्या काळात स्मार्टफोन नव्हते. त्यामुळे तिला तिच्या होस्टलवरुन बोलवायचे म्हणजे ते मोठे जिकरीचे काम होते.'
- 'अंजलीला गर्ल्स होस्टेलमधून बोलावण्यासाठी होस्टेलच्या गेटवर चढून कोणालातरी आवाज देऊन बोलवावे लागत होते.' 
- पिचाई म्हणाले, 'हे काम गुपचूप होऊ शकत नव्हते. कारण बोलावणारं जे कोणी असेल ते जोरात ओरडून सांगत होते- अंजली... सुंदर आलाय.'
 
20 वर्षांपूर्वी प्रथमच पाहिले कॉम्प्यूटर 
- जगातील सर्वात मोठ्या टेक्निकल फर्ममध्ये सीईओ असलेल्या पिचाई यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, की त्यांनी सर्वप्रथम कॉम्प्यूटर 20 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेही याच आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्ये. 
- पिचाई म्हणाले, आज वेगाने विकास होत आहे. आमच्याकडे स्मार्टफोन नव्हते. आम्ही मोठे होत होतो तेव्हा आम्हाला कॉम्प्यूटरही हताळता आले नाही. 

   आणखी काय म्हणाले पिचाई 
   - मी देखिल कॉलेज बंक केले होते. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता तेव्हा तो तुमचा हक्क असतो. मी रात्री उशिरापर्यंत जागरण करायचो आणि सकाळचे क्लास मिस करत होतो.
   - परंतू या सर्वांसोबत मी खूप मेहनत करत होतो. 
   - शिक्षण आवश्यकच आहे परंतू तुमची आवड काय आहे, त्याचा देखिल पाठपुरावा केला पाहिजे.
   
 जेव्हा पिचाई म्हणाले अबे साले.. 
   - आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतल्यानंतरचा एक किस्सा सुंदर पिचाईंनी शेअर केला. ते म्हणाले, मी येथे आलो तेव्हा मला हिंदी कळत नव्हते.
   - मेसमध्ये काम करणाऱ्याला मी एकदा अबे साले म्हणून हाक मारली होती.
- पिचाई म्हणाले, मला माहित नव्हते की अबे सालेचा काय अर्थ आहे. कोणाला बोलावण्याची ही पद्धत नसते हे माहितच नव्हते. त्यावर मेसवाला चिडला आणि त्याने काही वेळासाठी मेस बंद केली होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...