आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Selected The Option To Speak In Public Meetings Of Opposition, I Do Not As Parliament,

विरोधक संसदेत बोलू देत नाही, म्हणून जाहीर सभांमध्ये बोलण्याचा पर्याय - नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिसा (गुजरात) : नोटबंदीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष मला संसदेत बोलूच देत नाहीत. म्हणूनच जाहीर सभांमध्ये बोलण्याचा पर्याय मी निवडला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला.
नोटबंदीमुळे येणाऱ्या अडचणी आता कमी होतील. ५० दिवसांनी पाहा सारे सुरळीत झालेले असेल, असे स्पष्ट करून ८ नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर झाल्यानंतर हेराफेरी करणारे आणि काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही,
असा इशाराही त्यांनी दिला.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात डिसा येथील बनास डेअरीमध्ये अमूलच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी जाहीर सभेत बोलताना मोदींनी विरोधकांना चिमटे काढत भ्रष्टाचारी व काळा पैसा बाळगणाऱ्यांना कठोर इशारेही दिले.
संसदेतील गोंधळाबाबत...
विरोधी पक्ष संसदेचे कामकाज चालू देत नाही. सततच्या या गोंधळामुळे राष्ट्रपतीसुद्धा
व्यथित व्हावेत आिण त्यांनी समज द्यावी, हे दुर्दैवी असल्याचे मोदी म्हणाले. देशाचे भविष्य घडवण्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

१००च्या नोटेची किंमत वाढली
नोटबंदीनंतर देशात १०० रुपयाच्या नोटेची किंमत वाढली असल्याचे मोदी म्हणाले. यापूर्वी कमी मूल्याच्या चलनी नोटांबद्दल कुणालाच किंमत वाटत नव्हती. नोटबंदीमुळे श्रीमंतांची नव्हे, गरिबांची मात्र शक्ती वाढली आहे, असे मोदींनी नमूद केले.
लोकांना चिथावणी दिली जाते आहे...
मी प्रामाणिक लोकांच्या कायम सोबत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत नोटबंदीवरून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, एवढा त्रास आिण अडचणी सहन करूनही लोकांनी नोटबंदीचे स्वागतच केले असल्याचा दावा मोदींनी केला.
भ्रष्टाचार, दहशतवादाविरुद्ध लढाई
सरकारने जाहीर केलेली नोटबंदी म्हणजे भ्रष्टाचार व दहशतवादाविरुद्ध लढाई असलयाचे सांगून गेल्या ७० वर्षांत भारतात सातत्याने प्रामाणिक माणसाचीच लुबाडणूक झाली असल्याचे मोदी म्हणाले.
मला जाहीर विरोध करा, पण लोकांना शिकवा...
माझे विरोधी पक्षांना जाहीर आवाहन करत आहे, तुम्ही माझा जाहीरपणे विरोध करा. परंतु, ज्या लोकांना डिजिटल व्यवहारांची माहिती नाही त्यांना ती माहिती देऊन जागरुक करा. राजकीय वादाच्या पलिकडे जाऊन कुणी हे काम केले तर मला आनंद वाटेल, असेही मोदी यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...