आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Will Not Let India Down Says Modi In Arunachal Lates News

खबरदार! कोणी आमच्या भूमीवर हक्क सांगाल तर, मोदींचा बांगलादेशसह चीनला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर- अरुणाचल प्रदेश ही वीरजवानांची भूमी आहे. या भूमीसाठी अनेकांना वीरमरण आले आहे. परंतु, शेजारी असलेला बांगलादेश आणि चीन आपल्या मातेवर डोळे वटारुन पाहतो आहे. मात्र, येथील प्रत्येक व्यक्तीने भारत मातेच्या रक्षणासाठीच जन्म घेतला आहे. त्यामुळे खबरदार! अरुणाचलच्या भूमीवर कोणी हक्क सांगाल तर, असा इशारा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) दिला. मोदी अरुणाचल प्रदेशातील पसीघाट येथे आयोजित सभेत बोलत होते.

मोदी म्हणाले, अरुणाचलमधील प्रत्येक व्यक्ती भारत मातेचे रक्षण करणारा जवान आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं टूटने दूंगा, मैं देश नहीं टूटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। दुनिया की कोई ताकत हमसे हमारी जमीन को छीन नहीं सकती।' ही कविताही मोदींनी यावेळी सादर केली.

सूर्योदय अरुणाचलमधूनच...
सूर्योदय अरुणाचलमधूनच होतो. देशाचा विकासही या राज्यापासूनच होईल. पूर्व भागातील आठ राज्यांत कमळ उमलल्याशिवाय राहणार नाही, असा आशावादही मोदींनी यावेळी व्यक्त केला. गुजरात आणि अरुणाचलचे नाते फार जुने असल्याचेही मोदींनी सांगितले. दिल्लीत अरुणाचलचा सुपुत्राचा मृत्यु झाल्याचे सांगून मोदींनी नीडो तनियमच्या मृत्यूचा आवर्जुन उल्लेख केला.

अरुणाचल राज्यातील तरुणाई नाराज आहे. राज्यात बेरोजगारी वाढत आहे. नोकरीसाठी अनेकांना परराज्यांत स्थलांतरीत व्हावे लागत आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात जाहीर झालेल्या प्रकल्पांचा विकास झाला पाहिजे, असेही मोदींनी सांगितले.