आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Wouldn\'t Want To Live In India If Modi Becomes PM, Author Ananthamurthy Says

मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडण्‍याचा प्रख्‍यात लेखक डॉ. अनंतमुर्ती यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू- ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेते कन्‍नड लेखक डॉ. यू.आर अनंतमुर्ती यांनी जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले तर आपण देश सोडून जाऊ असा इशारा दिला आहे. भाजपनेही यावर प्रतिक्रिया देताना अनंतमुर्तींना देश सोडण्‍याचे स्‍वातंत्र्य असल्‍याचे म्‍हटले आहे.

मोदींविरोधी टीका केल्‍यामुळे वादाचा केंद्रबिंदू ठरलेले अनंतमुर्ती आजही आपल्‍या मतावर ठाम राहिले. इतकेच नव्‍हे तर गुजरातचे मुख्‍यमंत्री पंतप्रधान बनले तर लोकांमध्‍ये भयाचे वातावरण तयार होईल, असे म्‍हटले.

जिथे मोदी पंतप्रधान बनतील त्‍या देशामध्‍ये आपण राहू शकत नाही, असे त्‍यांनी नुकताच एका कार्यक्रमात म्‍हटले होते. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यानंतर भाजप आणि त्‍यांच्‍या समर्थकांकडून त्‍यांच्‍यावर मोठया प्रमाणात टीका होत आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना अनंतमुर्ती म्‍हणाले, देशात असा नागरिक समाज असला पाहिजे, जो भयभीत नसावा आणि असे शासन असले पाहिजे ज्‍यामध्‍ये लोक नेत्‍यांसमोर गुलामासारखे वागले नाही पाहिजे.

भाजपची प्रतिक्रिया वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...