आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट एअरबेसवर आकाशातून हल्ल्याची शक्यता, असे केले सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाशात काही संशयास्पद दिसले किंवा मोटरसारखा आवाज आला तर तत्काळ एअरफोर्सला त्याची सूचना देण्यास सांगण्यात आले. - Divya Marathi
आकाशात काही संशयास्पद दिसले किंवा मोटरसारखा आवाज आला तर तत्काळ एअरफोर्सला त्याची सूचना देण्यास सांगण्यात आले.
पठाणकोट - येथील एअरबेसवर दहशतवादी पॅराग्लायडिंगने हल्ला करण्याची शक्यता आहे. एअरफोर्सने याचा अलर्ट जारी केला आहे. आसपासच्या 24 किलोमीटर अंतरातील गावांमध्ये पॅराग्लायडर आणि पॅराशूटने सूचना देणारी पत्रके वाटण्यात आली आहेत. जनतेला आवाहन करण्यात आले आहे की जर कोणाला आकाशात काही संशयास्पद दिसले किंवा मोटरसारखा आवाज आला तर तत्काळ एअरफोर्सला त्याची सूचना द्यावी.

गावांमध्ये दहशतीचे वातावरण
- या वर्षाच्या सुरुवातीला, 2 जानेवारी रोजी पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाला होता. त्यानंतर संसदीय स्थायी समितीनेही एअरबेसवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे.
- दहशतवादी याच परिसरात लपून बसले असण्याची शक्यता आहे.
नागरिकांना ग्लायडर लाइट आणि आवाजाबद्दलही दिली माहिती
- एअरबेसला लागून असलेल्या ताजपूर गावातील छज्जू राम नामक व्यक्तीने सांगितले, की एअरफोर्सने पोस्टर्स वाटले आहेत. त्यात पॅराग्लायडरसंबंधी माहिती दिली आहे आणि असे काही दिसल्यानंतर एअरफोर्सला फोन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- दर्शापूरचे जगन्नाथ म्हणाले, ग्लायडरच्या मोटरचा आवाज आणि लाइटबद्दलही सांगितले आहे.
- ढाकी येथील सुनील कुमार म्हणाले, एअरबसेचे कर्मचारी आले होते. त्यांनी सर्वांना सुरक्षेच्या सूचना दिला आणि सर्वांना सांगण्यास सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पठाणकोट एअरबेसच्या आसपासच्या गावात वाटण्यात आलेली पत्रके..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...