आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस अनुराग ठाकूर यांचा मृत्यू श्वास कोंडल्याने, लखनऊमध्‍ये रस्‍त्‍याच्‍या कडेला आढळला होता मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचा अहवाल शवविच्छेदनानंतर आला आहे. त्यांचा मृतदेह गेल्या बुधवारी लखनऊच्या मीराबाई गेस्ट हाऊसजवळील रस्त्याच्या कडेला आढळला होता. त्यांचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची भेट घेऊन केली होती.

त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे चौकशी देण्याचा निर्णय घेतला. अनुराग तिवारी मूळचे उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रहिवासी होते. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. गेल्या वर्षी ते बिदरला उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीवर गेले होते. तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. बिदर येथे १३० पेक्षा जास्त टँकर आणि १०० पेक्षा जास्त विहिरींचे खोदकाम करून तेथील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर ५०० वर्षे जुन्या “जहाज की बावडी’ची सफाई करून त्यांनी ती विहीर पाण्याने पुन्हा भरून काढली.
बातम्या आणखी आहेत...