आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडी IAS ऑफिसरला हवा आहे गुड लुकिंग - फाडफाड इंग्लिश बोलणारा ड्रायव्हर, घरात लावले 25 AC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आएएस अराधना शुक्ला उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या प्रधान सचिव आहेत. - Divya Marathi
आएएस अराधना शुक्ला उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या प्रधान सचिव आहेत.
लखनऊ - उत्तर प्रदेशातील एका लेडी आयएएस ऑफिसरला गुड लुकिंग आणि अस्खलित इंग्लिश बोलणारा ड्रायव्हर पाहिजे आहे. ड्रायव्हरच्या शोधात राज्याच्या परिवहन विभागाचा घाम निघत आहे. लेडी आयएएसच्या आदेशानंतर परिवहन विभागाने राज्यातील वाहन चालकांचे बायोडेटा मागवले आणि त्यांच्या झटपट मुलाखती घेण्यात आल्या आहेत. 
 
50 हून अधिक ड्रायव्हर्सने दिली मुलाखत
- राज्याच्या परिवहन विभागाच्या प्रधान सचिव आराधना शुक्ला यांना गुड लुकिंग, इंग्लिंश बोलणारा हँडसम ड्रायव्हर पाहिजे. त्यासाठी परिवहन विभागाने 50 हून अधिक ड्रायव्हर्सला मुलाखतीसाठी बोलवाले. 
- मुलाखतीसाठी आलेल्या ड्रायव्हर्सला माहित नव्हते की त्यांना कशासाठी बोलावण्यात आले आहे. परिवहन विभागाने मुलाखतीसाठी आलेल्या वाहन चालकांना गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग म्हणता येते की नाही, ते कसे बोलतात, कसे दिसतात त्यांचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे याचे परिक्षण केले. 
- विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की चालकांना यासाठी बोलावण्यात आले जेणे करुन रोस्टरला धक्का लागू नये. 
- परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्ही.के.मौर्य म्हणाले, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांकडे दोन चालकांची नियुक्ती करायची आहे. त्यासाठी वाहन चालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 
- विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातून 50 पेक्षा जास्त वाहन चालक मुलाखतीसाठी आले होते. त्यापैकी 6 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यातील दोघांचे नाव प्रधान सचिव अराधना शुक्ला या फायनल करतील. 
 
यामुळे अराधना शुक्ला आल्या होत्या चर्चेत
- आयएएस अधिकारी अराधना शुक्ला या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) घोटाळ्यातील आरोपी प्रदीप शुक्ला यांच्या त्या पत्नी आहेत. या घोटाळ्यात प्रदीप शुक्ला यांची प्रमूख भूमिका राहिली होती. या प्रकरणी त्यांना जेलची हवाही खावी लागली होती. 
- अराधना शुक्ला याआधी नोएडा प्राधिकरणात ओएसडी पदावर कार्यरत होत्या. त्यावेळी सरकारी बंगल्यात त्यांनी 25 एसी लावल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. 
- एवढेच त्यांचे कारनामे नाहीत तर सरकारी बंगल्याच्या सौदर्यीकरणावर त्यांनी 37 लाख रुपये खर्च केले होते. अशीही माहिती आहे की त्यांच्याकडे 13 गाड्यांचा ताफा आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रदीप शुक्लांना खावी लागली होती तुरुंगाची हवा... 
बातम्या आणखी आहेत...