आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉबर्ट वढेरा-डीएलएफ जमीन व्यवहार उघड करणारे IAS अशोक खेमकांची 45वी बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - हरियाणाच्या मागील सरकारमध्ये रॉबर्ट वढेरा - डीएलएफ जमीन व्यवहार उघड करुन चर्चेत आलेले व्हिसलब्लोअर आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची आता भाजप सरकारने बदली केली आहे. त्यांना परिवहन आयुक्त पदावरुन पुरातत्व खात्यात पाठवण्यात आले आहे. याआधीच्या हुड्डा सरकारने देखील त्यांना बरेच दिवस याच खात्यात ठेवले होते. 24 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची ही 45 वी बदली आहे. बदली सत्राने त्रस्त खेमका यांनी ट्विट केले आहे, की साधनांची कमतरता असताना परिवहन विभागातील भ्रष्टाचार अटोक्यात आणण्याचा आणि कार्यशैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला होता. हा क्षण त्रासदायक आहे.
हरियाणा सरकारने बुधवारी रात्री नऊ आयएएस आणि एक एचसीएस अधिकार्‍याची बदली केली. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुमिता मिश्रा यांना देखील सीएमओ बाहेर करण्यात आले आहे. खेमका यांच्या बदलीवर राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, की खेमका बहुचर्चित अधिकारी आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या बदलीसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
ट्विटमुळे झाली बदली
राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच खेमका यांना परिवहन आयुक्त पद देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे संकेत भाजप सरकारने दिले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांना साइटलाइन करण्यात आले आहे. त्याचे कारण खेमका यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते, ते असल्याची चर्चा आहे. खेमका यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की वढेरा-डीएलएफ व्यवहाराच्या आरोपपत्राचे काटे अजूनही बोचत असून कॅग अहवलात अजूनही बर्‍याच गोष्टी तशाच आहेत. त्यांना स्पर्ष झालेला नाही. त्या ट्विट मध्ये गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांचीही एक
ओळ होती. 'एकला चलो'. त्यातून त्यांनी त्यांची निराशा व्यक्त केली होती. त्यावर आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी मी त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, खेमकाने काही वेगळे काम केले नाही
या मुद्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, 'खेमका यांनी काहीही वेगळे काम केलेले नाही. त्यांनी त्यांची ड्यूटी केली आहे.' तसेच मुख्यमंत्री म्हणाले, की प्रामाणिक अधिकार्‍याला त्रास होऊ देणार नाही.