आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 महिने रेप करत राहिला माजी IAS; तरुणीला म्हणाला- मुलाशी लग्न कर, मग सोबतच राहू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - तरुणीला ऑफिसर बनवण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी निवृत्त आयएएस बी.बी. मोहंतीने सरेंडर केले आहे. मोहंती गत 2  वर्षांपासून फरार होता. यामुळे त्याची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली होती. पीडितेचा आरोप होता की, मोहंतीने अनेक वेळा अधिकारी बनवण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला.


असे आहे पूर्ण प्रकरण...
- सन 2014 मध्ये वरिष्ठ आयएएस मोहंतीविरुद्ध एका एमबीएच्या विद्यार्थिनीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पीडितेने आरोप केला होता की, मोहंतीने आयएएस अधिकारी बनवण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून 11 महिने बलात्कार केला. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांत या प्रकरणाची नोंद झाली. 23 वर्षीय पीडित विद्यार्थिनी जयपूरमध्ये राहते. ती मूळची बलिया (उ.प्र.)ची राहणारी आहे.

 

माझ्या लहान मुलाशी लग्न कर, दोघेही सोबत राहू
- पीडितेचा आरोप होता की, डिसेंबर 2013 मध्ये मोहंतीने पीडितेला बोलावून म्हटले की, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या लहान मुलाची पत्नी त्याला सोडून गेली आहे. यामुळे मोहंतीने पीडितेला म्हटले की, तू लहान मुलाशी लग्न कर, मग आपल्याला सोबत राहता येईल. तरुणीचा आरोप आहे की, तो नेहमी घरच्या आसपास येऊन मला एकटी पाहून बळजबरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा.

 

आपल्या फ्लॅटवर बोलावून करत होता शोषण
- यानंतर आरोपी सातत्याने वेगवेगळ्या नंबरवरून तिला फोन करायचा आणि आपल्या फ्लॅटवर बोलावून 11 महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण करत राहिला. तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने लग्नाला नकार दिला आणि फोनवर बोलणेही बंद केले. तरुणीने यासंबंधी न्यायालयात आरोपी मोहंतीविरुद्ध तक्रारअर्ज दाखल केला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...