आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IAS Khemak Transfer 47 Times In His Total 22 Years Service

आयएएस खेमकांची २२ वर्षांच्या नोकरीतील आता ४७वी बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - वढेरा-डीएलफ जमीन सौद्याचा पर्दाफाश करणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा बदली झाली आहे. २२ वर्षांच्या नोकरीत खेमकांची ही ४७ वी बदली आहे. परिवहन विभागातून त्यांना पुरातत्त्व विभागात पाठवण्यात आले आहे. हरियाणाच्या भाजप सरकारने बुधवारी बदलीचे आदेश काढले.
खेमकांनी ट्विट केले, "हा क्षण माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे. परिवहन विभागात अनेक अडथळे व मर्यादा असतानाही भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. दरम्यान, खेमकांच्या बदलीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आरोग्यमंत्री अनिल वीज म्हणाले.
धडाकेबाज अधिकारी

गेले तेथे खेमका यांनी एक तरी घोटाळा उघडकीस आणला. महसूल विभागात त्यांनी वढेरा-डीएलएफ जमीन घोटाळा काढला. कृषी विभागात रेक्सिल औषध व बियाणे खरेदीतील गैरव्यवहार उजेडात आणला. व्यावसायिक वाहनांच्या ओव्हरलोडिंगवर लगाम आणण्याचे काम सध्या ते करत होते.