आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात बलात्कार प्रकरणातील आरोपी IAS अधिकाऱ्याने केले सरेंडर, 2 वर्षांपासून होते फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी 2 वर्षांपासून फरार होता. - Divya Marathi
आरोपी 2 वर्षांपासून फरार होता.

जयपूर- बलात्काराचा आरोप असणारे IAS बी. बी. मोहंती यांनी मंगळवारी सरेंडर केले. 2014 मध्ये एका मुलीने मोहंती यांच्या विरोधात जयपूर येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहंती हे फरार झाले होते. पोलिस वैद्यकीय तपासणीनंतर मोहंतीची चौकशी करतील. मुलीने आरोप केला होता की नोकरीचे आमिष दाखवत मोहंती यांनी बलात्कार केला होता. 

 

 

वरिष्ठ IAS अधिकारी मोहंती
- मोहंती हे 1977 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS आहेत. ते राजस्थान सरकारच्या अनेक महत्वपूर्ण पदावर राहिले आहेत.
- 2014 मध्ये एका मुलीने त्यांच्यावर महेश नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या मुलीचा आरोप होता की त्यांनी तिला IAS करण्याचे व लग्नाचे आमिष दाखवत 11 महिने बलात्कार केला. मोहंती तिला एका फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार करत होते. 

 

 

मुलीने कोर्टात काय सांगितले?
- 17 फेब्रुवारी 2013 रोजी ही मुलगी मोहंती यांच्या घरी नोट्स घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी तिला आपण लवकर राजस्थानचे मुख्य सचिव होणार असल्याचे सांगितले. तुला चांगली सरकारी लावतो, असे आमिष त्यांनी तिला दाखविले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...