आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IAS Officers Filed Application, To Change Cadre For Marriage

साहेबांचा अर्ज, लग्नासाठी केडर बदलून द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - देशातील १३ आयएएस अधिका-यांनी केंद्राकडे अर्ज दिला आहे. आमचे लग्न होणार असून यासाठी आमची बदली सासरच्या गावी करावी, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. येथे सासरी म्हणजे जेथे त्यांचा जीवनसाथी कार्यरत असलेले शहर, असा आहे. लग्नाच्या परंपरेशी त्याची सांगड घातली असता त्याचा अर्थ महिला अधिकारी आपले "माहेर' म्हणजेच सध्याचे केडर सोडून सासरी म्हणजेच दुस-या राज्यात जातील. मात्र पुरुष अधिका-यांच्या बाबतीत हा फेरबदल मोठा रंजक असेल. अर्ज देणारे अधिकारी आपले केडर सोडून "सासरी' म्हणजे वाग्दत्त वधूच्या राज्यातील केडरमध्ये जाण्यासाठी बदली मागत आहे.

माहेर सोडून सासरी जाणार : जम्मू-काश्मीर केडरच्या आयएएस अधिकारी अफसाना परवीन यानी केरळचे आयएएस जफर मलिक यांना जीवनसाथी म्हणून निवडले आहे. त्यांनी केरळ केडरमध्ये बदलीसाठी अर्ज दिला आहे. छत्तीसगड केडरच्या आयएएस स्वाती श्रीवास्तव या उत्तराखंड केडरचे आयएएस नितीनसिंह भदौरिया यांच्याशी लग्न करणार आहेत. म्हणून त्यांना उत्तराखंडमध्ये बदली हवी आहे. केंद्रीय कार्मिक विभागानुसार, लग्नाच्या आधारावर केडर बदलण्याची तरतूद संबधित कायद्यात आहे. तथापि, त्यासाठी सध्या पोस्टिंग
असलेल्या राज्याकडून मंजुरी घ्यावी लागते. लग्नाचे कारण देऊन बदली मागणा-या अधिका-यांपैकी काहींनी भावी पती-पत्नीच्या व्यवसाय-नोकरीबाबत काहीही माहिती दिलेली नाही.