आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी: 84 IAS, 54 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या, समाजवादीच्या बालेकिल्ल्यातही केले मोठे बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- योगी सरकार सत्तेत आल्यानंतर यूपीच्या प्रशासनात सर्वात मोठा बदल केला आहे. लखनऊसह 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांच्या तसेच 84 आयएएस आणि 54 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. सीडीओ कौशल राज शर्मा यांना लखनऊच्या जिल्हाधिकारीपदी तर दीपक कुमार यांना एसएसपीपदी बदली करण्यात आली आहे. कुमार आधी गाझियाबादचे एसएसपी होते.

दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मृत्यृंजय नारायण यांच्याकडे महसूल विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. एकूण 39 जिल्ह्यांचे एसएसपींच्या बदली करण्‍यात आल्या आहे. याशिवाय समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यातही मोठे बदल केले आहेत. 

सहारनपूरच्या वादग्रस्त‍ एसएसपीची बदली...
-सहारनपूरमध्ये काही दिवसांपूर्वी मिरवणुकीत हिंसा भडकली होती. त्यानंतर चर्चेत आलेले एसएसपी लव्ह कुमार यांची नोएडा येथे बदल करण्यात आली आहे. हिंसक घटनेनंतर लव्ह कुमार आणि सहारनपूरचे भाजपचे खासदार राघव लखनपाल शर्मा यांच्यात बाचाबाची झाली होती.
- आगर्‍याचे एएसपी अनुराग वत्स यांना नॉर्थ लखनऊचा चार्ज देण्यात आला आहे. बरेलीचे एएसपी डॉ.सतीश कुमार यांना लखनऊ (रूरल) एसपीपदी बढती मिळाली आहे.

समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यांत मोठे बदल...
- समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यांत मोठे बदल करण्‍यात आले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या इटावा जिल्ह्यात सेल्वा कुमारी यांना जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.
- मैनपुरीच्या जिल्हाधिकारीपदी यशवंत राव यांची तर डिंपल यादव यांचा लोकसभा मतदार संघ कन्नौजच्या जिल्हाधिकारीपदी जगदीश प्रसाद यांची नियुक्त करण्यात आले आहे.

लखनऊच्या महिला एसएसपींना हटवले...
- अखिलेश सरकारच्या कार्यकाळात लखनऊमधील पहिल्या महिला एसएसपी मंजिल सैनी यांना हटवण्यात आले आहे. सैनी यांच्याकडे नोएडाध्ये पीएसीच्या 49 व्या वाहिनीचे नैतृत्त्व सोपवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर  गाझियाबादचे एसएसपी दीपक कुमार यांची बदली करण्‍यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...