आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IAS Wife जेव्हा स्वतःच्या घरात जाते गेटवरुन, का करावे लागले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IAS पतीने पत्नीला घरात येऊ द्यायचे नाही असे फर्मान सोडल्याने स्वतःच्या घरात असे गेटवरुन जाण्याची वेळी आली. - Divya Marathi
IAS पतीने पत्नीला घरात येऊ द्यायचे नाही असे फर्मान सोडल्याने स्वतःच्या घरात असे गेटवरुन जाण्याची वेळी आली.
रांची (झारखंड) - रांचीचे एक आयएएस अधिकारी आदित्य कुमार आनंद यांची पत्नी स्वतःच्याच घरात गेटमधून नाही तर जवळपास आठ फुटांच्या गेटवरुन उडी मारून प्रवेश करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनी सुरुवातीला गेट उघडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून ते उघडले नाही. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनीही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग होऊ शकला नाही. गेट आतीलबाजूने लॉक असल्याने बाहेरून ते उघडण्याचा कितीही प्रयत्न झाला असता तरी तो निष्फळ ठरणार होता. हे ओळखून आदित्यकुमार यांच्या पत्नीने अखेर गेटवरुन उडी मारुन घरात प्रवेश केला.
का करावे लागले असे...
> आदित्य कुमार हे रांचीमध्ये एसडीओ आहेत.
> ज्यावेळी त्यांच्या पत्नी गेट उघडण्याचा प्रयत्न करीत होत्या, तेव्हा घरात कोणीही नव्हते असे नाही. तिथे चौकीदार, शिपाई आणि इतरही कर्मचारी हजर होते.
> आदित्य कुमार आणि त्यांच्या पत्नीचे काही कारणावरुन भांडण झाले होते. त्यानंतर आदित्य कुमार यांनी शिपायांना आदेश दिला की मॅडम आल्यातर गेट उघडायचे नाही.
> हुकुमाचा ताबेदार नोकरवर्ग आयएएस आदित्यकुमार यांच्या शब्दाबाहेर गेला नाही, त्यांनी मॅडमसाठी गेट उघडले नाही. परंतू घराच्या मालकीनीला घरात जाण्यापासूनही ते रोखू शकले नाही.
- प्रकरण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर आएएएस आदित्य कुमार यांनी आमच्यातील कौटुंबीक वाद मिटला असल्याचे सांगितले आहे. मात्र याआधीही त्यांनी पत्नीला घराबाहेर काढले होते, असेही कळते.
पुढील स्लाइडमध्ये VIDEO, आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीला कशी मारावी लागली गेटवरून उडी...
बातम्या आणखी आहेत...