आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयबी’प्रमुख शिकले सरकारी शाळेत, दिनेश्वर शर्मांचा केरळच्या सुरक्षेवर फोकस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया(बिहार)- दिनेश्वर शर्मा यांची इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या संचालकपदी निवड झाली आहे. या बातमीने त्यांच्या वडिलोपार्जित गावी, बेलागंज येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातील सरकारी शाळेत शिकलेला मुलगा आज देशाच्या सर्वोच्च गुप्तहेर संस्थेचा प्रमुख झाल्याचा सार्थ अभिमान गावक-यांनी व्यक्त केला.

बेलागंजपासून १ किमी अंतरावर असलेल्या खनेटा येथील शाळेत दिनेश्वर यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. येथे सहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ते गया येथून दहावी झाले. १९७२ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी गया येथील अनुग्रह मेमोरियल कॉलेजमधून पदवी घेतली. प्रशासकीय परीक्षेच्या तयारीसाठी ते दिल्लीला गेले. मात्र येथे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या.

१९७८ नंतर ते अलाहाबादला आले. ६ महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली. नोव्हेंबर १९७९ मध्ये त्यांची निवड इंडियन पोलिस सेवेत झाली. आयपीएस उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी आयएफएसची नोकरी सोडली.

१८ हजार गुप्तचरांचा स्टाफ
चार मोठी आव्हाने
मनुष्यबळ : आयबीकडे सध्या १८ हजार गुप्तचरांचा स्टाफ आहे. वास्तवात २६ हजारांपेक्षा जास्त जवानांची गरज आहे.
अंतर्गत सुरक्षा : इंडियन मुजाहिदीन आणि सिमीचे वाढते नेटवर्क हे सर्वात मोठे संकट देशांतर्गत सुरक्षेवर आहे.
दहशतवाद: अल कायदा आणि आयएसआयएस या संघटना राज्यवार आपली पकड मजबूत करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. युवकांना आपल्या जाळ्यात आेढण्याचे त्यांचे धोरण आहे.

केरळवर फोकस
दहशतवाद्यांना आश्रय घेण्यासाठी केरळ सर्वाधिक सुरक्षित आहे. दिनेश्वर यांचा फोकस सध्या केरळच्या सुरक्षिततेवर आहे.