आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Identify Dead Body Found Young Girl Different Pieces Lucknow News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोत्यात सापडले 17 वर्षीय तरुणीचे अनेक तुकडे; हत्येपूर्वी बलात्काराचा संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: मृत तरुणीचे छायाचित्र)

लखनौ- उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील वृंदावन कॉलनी एका पोत्यात 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणीची हत्या करून तिचे तुकडे करुन पोत्यात भरले होते. तरुणीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून ती अमिनाबाद भागातील रहिवासी आहे.

मिळालेली माहिती अशी की, गेल्या रविवारी ती वडिलांचे जॅकेट ड्रायक्लीन करण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ झाला पण तरूणी घरी परतली नसल्याने तिच्या आई-वडीलांनी तिचा शोध घेतला. पोलिसांतही ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तरुणीच्या आईने तिला फोन केला होता. मात्र, मोबाइल स्विच ऑफ होता. रविवारी सायंकाळी पुन्हा फोन केला तेव्हा एक तरुणाने फोन उचलला होता. 'लवकर बोला' एवढेच म्हटले आणि पून्हा मोबाइल स्विच ऑफ झाला.

सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तरुणीच्या मोबाइलवरून एका तरुणाचा फोन आला होता. त्याने सांगितले की, त्यांची मुलगी पीजीआयमध्ये अॅडमिट आहे. तरुणीचे आई-वडील तत्काळ पीजीआयमध्ये पोहोचले. परंतु, त्यांची मुलगी मिळाली नाही.

पीजीआय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन कॉलनीत मंगळवारी एका पोत्यात तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
पोलिसांनी याप्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. टिंकू सोनकर, आदित्य गुप्ता, ऐहसान आणि अभिषेक अशी चौघांची नावे आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहे. दुसरीकडे, मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो