आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरकारचा आदेश मिळाल्यास पाकिस्तानशी व्यापार बंद करू’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चहा व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारचा आदेश मिळाल्यास पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करू, अशी भूमिका घेण्यात आली आहे. सरकारने आपली इच्छा व्यक्त केली तर पाकिस्तानसोबतचा व्यवहार थांबवण्यात येईल, असे आयटीएचे अध्यक्ष आझम मेनम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, चहाच्या क्षेत्रात पाकिस्तान भारतासाठी व्यापारी मित्र आहे. तसे झाल्यास चहाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. चहाविषयक नियामक मंडळ त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे मेनम यांनी सांगितले. पाकिस्तानला किमान १५ ते १८ दशलक्ष किलोग्रॅम चहाची निर्यात केली जाते. देशात चहाचे एकूण उत्पादन २३० दशलक्ष किलोग्रॅम एवढे होते.

श्रीलंका, केनियातून आयात
पाकिस्तान सामान्यपणे चहाची आयात श्रीलंका, केनियातून करतो, परंतु भारतात चहाचे दर कमी झाल्यानंतर पाकिस्तानचे प्राधान्य भारताला असते. पाकिस्तानात निर्यात केल्या जाणारा ८० टक्के माल दक्षिण भारतीय असतो. २० टक्के उत्तर भारतातील असतो. आता भारताची निर्यात कमी होईल.

महत्त्वाची बाजारपेठ
रशिया, कझाकिस्तान, अमेरिका, चीन, इजिप्त, लॅटिन अमेरिका या भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. भारत या देशांमध्ये चहाची मोठी निर्यात करतो.
बातम्या आणखी आहेत...