आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If I Talk More Then I Traping In Trouble Amit Shah

जास्त बोललो तर अडचण होईल - अमित शाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर - राम मंदिर मुद्द्यावरून भाजपचे सरचिटणीस अमित शाह संकटात सापडले आहेत. या मुद्द्यावर बोलू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे, परंतु आपण मोठ्या प्रयत्नाने पक्षाचे सरचिटणीस झालो आहोत. जास्त काही बोललो तर अडचण निर्माण होईल, असे शाह यांनी म्हटले आहे. अयोध्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे लवकरच भव्य राम मंदिर उभारण्यात येईल, असे शाह यांनी शनिवारी बोलताना म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ते गोरखपूर दौ-यावर आले. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना टाळले. उत्तर प्रदेशातील 11 लोकसभा मतदारसंघांच्या आढाव्यासाठी आयोजित बैठकीस त्यांनी हजेरी लावली.