आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Lalu Nitish Government Come Into Power, There Will Bad Sign Amit Shah

लालू-नितीश यांचे सरकार आले तर पाकमध्‍ये आतषबाजी होईल - अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्‍ये जर लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांची सरकार सत्तेत आल्यास पाकिस्तानमध्‍ये आतषबाजी केली जाईल, असे भाजप अध्‍यक्ष अमित शहा यांनी हल्ला चढवला. शहा हे गुरुवारी(ता.29) राज्यातील बेतिया येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
लालू-नितीश जिंकले तर शहाबुद्दीन खूश होतील -
शहा म्हणाले, की नुकतेच सीवानला जाऊन आलो. तेथे मी विचारले महाआघाडीची सत्ता आल्यास कोण खूष होईल. जर पाटणामध्‍ये लालू-नितीश सरकार सत्तेवर आली तर सर्वाधिक आनंद तुरुंगात कैद असलेल्या मोहम्मद शहाबुद्दीनला होईल.
अमित शहा तुरुंगात राहिले असते तर चांगले झाले असते - केसी त्यागी
अमित शहा तुरुंगात असते तर चांगले झाले असते, असे जनता दल यूनाइटेटचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी भाजप अध्‍यक्षांवर तोफ डागली. अशा प्रकारच्या घटना बिहारमध्‍ये होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी वेळ मागणार आहोत आणि अमित शहा-पंतप्रधान यांची तक्रार करणार आहे, असे त्यागी म्हणाले.