आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगाव मर्डर: गरज पडली तर \'रेयान\' टेक ओव्हर करणार -हरियाणा सरकार, पिंटो फॅमिलीचे संकट वाढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा सरकारने रेयान इंटरनॅशनल स्कूल टेक ओव्हर करण्याची गरज पडली तर ते देखील केले जाईल असे म्हटले. - Divya Marathi
हरियाणा सरकारने रेयान इंटरनॅशनल स्कूल टेक ओव्हर करण्याची गरज पडली तर ते देखील केले जाईल असे म्हटले.
चंदीगड - गुडगावमधील रेयान इंटरनॅशनल स्कूल विरोधात हरियाणा सरकार कडक कारवाई करण्याच्या विचारात आहे. शाळेतील गैरकारभार आणि अनियमीतता लक्षात आल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली असल्याचे राज्याचे अतिरिक्त शिक्षण सचिव के.के. खंडेलवाल यांनी सांगितले आहे. गरज पडली तर सरकार रेयान इंटरनॅशनल स्कूलचे अधिग्रहण (टेक ओव्हर) देखील करु शकते. आठ दिवसांपूर्वी (8 सप्टेंबर) येथील रेयान स्कूलमध्ये 7 वर्षांच्या मुलाचा मर्डर झाला होता.
 
या नियमांनुसार अधिग्रहण 
- के.के. खंडेलवाल गुरुवारी मीडियासोबत बोलताना म्हणाले, 'शाळेच्या कारभारात अनियमीतता आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नियमांचे पालन केले नाही तर शाळा टेक ओव्हर करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.'
- 'राज्य सरकार शिक्षकांच्या समस्येवरही संवेदनशील आहे. त्यासोबतच शिक्षकांची जबाबदारीही निश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना अचानक तपासणीचे अधिकार देण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांचे काम चोख राहिल.'
 
पिंटो फॅमिलीला विदेशात जाण्यास बंदी 
- रेयान इंटरनॅशनलचे सीईओ रेयान पिंटो आणि त्यांचे आई-वडील ऑगस्टिन पिंटो व ग्रेस पिंटो यांच्या अंतरिम जामीनावर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यांना एक दिवसाचा दिलासा मिळाला होता. 
- कोर्टाने या तिघांनाही देश सोडून जाण्यास बंदी घातली आहे. त्यासोबतच, गुरुवारी पंजाब-हरियाणा हायकोर्टात अपील करण्यास सांगितले आहे. 
- दरम्यान, गुडगावमध्ये एसआयटीने हरपाल शिवाय सेक्शन इन-चार्ज अंजू डुडेजा, निलंबित प्राचार्य नीरजा बत्रा, माजी प्राचार्य राखी वर्मा, बस ड्रायव्हर सौरभ राघव, बस कंडक्टर हरकेश प्रधान आणि 8 सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. 
- रेयान सीईओ रेयान पिंटो आणि त्यांच्या आई-वडिलांनी अटकेच्या भीतीने मुंबई हायकोर्टात अंतरिक जामीनासाठी अर्ज केला आहे. 
 
काय आहे प्रकरण
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्याच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली होती. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. 
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला. 
- मुलाच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...