आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक म्हणत असेल तर हजार वर्षे लढू, मी तयार - नरेंद्र माेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझीकोडे - उरी हल्ल्याच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीनिमित्त आयोजित सभेत बाेलताना पाकच्या शासकांवर टीकास्त्र सोडतानाच त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. ‘ मी पाकिस्तानी जनतेला सांगू इच्छितो की, तुमचे सरकार तुमची दिशाभूल करण्यासाठी भारताशी एक हजार वर्षांपर्यंत लढण्याची भाषा करत आहे. मी लढायला तयार आहे... चला लढू या... पाहू आपल्या देशातील गरिबी आधी कोण संपवताे? बेरोजगारी कोण नाहीशी करतो? निरक्षरता हद्दपार कोण करतो?,’असे मोदी म्हणाले. तत्पूर्वी मोदींनी दिल्लीत भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांशी चर्चा केली होती.

पाक जनतेशी संवाद
पाक जनतेला उद्देशून मोदी म्हणाले,१९४७ पूर्वी तुमचे पूर्वज भारतभूमीला प्रणाम करत होते. आपली मानत होते. तुमच्या शासकांना विचारा की, दोन्ही देश एकदाच स्वतंत्र झाले. भारत सॉफ्टवेअर निर्यात करताे तर पाक दहशतवाद का करताे?
बातम्या आणखी आहेत...