आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवपाल बाहेर पडल्यास सपाची वाईट स्थिती - मुलायमसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी समाजवादी पार्टीतील दुफळी वाढू लागली आहे. घरातील दोन पिढ्यांतील लढाई चव्हाट्यावर आली आहे. सपाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी सोमवारी पक्ष कार्यालयात ध्वजरोहणादरम्यान यादव कुटुंबातील संघर्ष समोर आणला. शिवपाल सिंह यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना थांबवले. त्यांची क्षमता मी आेळखतो. त्यांनी राजीनामा दिल्यास पक्षाची दयनीय अवस्था होईल, असे मुलायम यांनी म्हटले.

मुलायम यांचे कुटुंब देशातील सर्वात मोठे राजकीय घराणे आहे. त्यांच्या कुटुंब, नातेवाईकातील ४८ लोक सक्रिय राजकारणात आहेत. शिवपाल यादव हे मुलायम यांचे धाकटे भाऊ आहेत. ते समाजवादी पार्टीच्या स्थापनेपासून सक्रिय आहेत. पुतण्या अखिलेश यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सिंचन व महसूल विभाग आहेत. त्यांची संघटनात्मक पकडही मजबूत आहे. संघटनेत बळकट असलेल्या शिवपाल यांच्या आदेशाला मात्र सरकारच्या इतर विभागात महत्व दिले जात नाही. काही दिवसांपूर्वी माफिया मुख्तार अन्सारी यांचा पक्ष कौमी एकता दलाचे सपामध्ये विलीनीकरण करण्यामागे शिवपाल यांची भूमिका होती. त्यास अखिलेश यांनी पक्षादेश देत रद्द ठरवले होते. त्यानंतर सैफईच्या यादवांच्या कुटुंबात फूट पडल्याचे दिसून आले होते. रविवारी शिवपाल यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे मैनपूरीमध्ये जाहीर केले होते. कार्यकर्ते जमिनींवर कब्जा करून जनतेवर अन्याय करत आहेत. अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत. ते आता राजीनामा देणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

शिवपाल यांना पक्षाचे समर्थन : विपाल यादव यांची बाजू घेताना मुलायम यांनी अखिलेश यांच्या निकटवर्तीय नेत्यांना लक्ष्य केले होते. ही नेतेमंडळी सर्व कामांत हस्तक्षेप करत आहे, असे मुलायम यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांंशी वाद नाही
मुख्यमंत्री अखिलेश यांच्याशी माझे वाद नाहीत. ते चांगले काम करत आहेत. जमिनींवर कब्जा करणाऱ्यांनी ही गोष्ट करता कामा नये. अन्सारी यांच्या सपामधील प्रवेशाबाबतचा निर्णय मुलायम घेतील.

वक्तव्य नको, कारवाई करा
मुलायम व शिवपाल यादव जमिनी गिळंकृत करणाऱ्यांबद्दल वारंवार बोलू लागले आहेत. परंतु त्यांच्यावर काहीही कारवाई मात्र करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची वक्तव्ये जमिनी लाटणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरली आहेत, असे प्रदेश भाजपध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...