आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You Put Broken Egg On Floor In Telangana It Becomes Omelette

तेलंगणाः उन एवढं की फरशीवर अंडे फोडले तर तयार झाले ऑमलेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद (आंध्र प्रदेश)- तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात उन्हाने जिवाची लाही लाही केली आहे. दुपारी तर अगदी कर्फ्यु लागल्याप्रमाणे रस्ते मोकळे असतात. पाणी टंचाईचे तर विचारुच नका. एका महिलेने उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी एक भन्नाट प्रयोग केला. घराच्या अंगणात असलेल्या फरशीवरच ऑमलेट तयार केले. विशेष म्हणजे यासाठी तिने अग्नीचा वापर केला नाही.
तेलंगणातील करीमनगर जिल्हा सध्या उन्हात होरपळून निघत आहे. उन लागल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांचा यात मृत्यूही झालाय. एवढी उन्हाची दाहकता येथे दिसून येते.
उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी एका महिलेने घराच्या अंगणात असलेल्या फरशीवर अंडे फोडले. त्याचे काही मिनिटांत ऑमलेट तयार झाले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या महिलेने कसे तयार केले ऑमलेट... अखेरच्या स्लाईडवर बघा याचा व्हिडिओ...