आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली हवी असल्यास वजन घटवा - आयजी डॉ. बी. आर. मेघवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बीएसएफमध्ये राजस्थान फ्रंटियरचे आयजी डॉ. बी. आर. मेघवाल यांची आेळख फिटनेस गुरूसारखीच आहे. पाच महिन्यांत किमान ५० जवानांचे जीवन त्यांनी बदलून टाकले, असे हे गुरू. ढेरपोटेपणा असो की अधिक वजन, ते कमी केल्याशिवाय राहत नाहीत. तेदेखील केवळ ३० दिवसांत. फॉर्म्युला एकच. बदली किंवा प्रतिनियुक्ती हवी असल्यास वजन कमी करणे ही एकमेव अट मेघवाल घालतात. जवानाने एक महिन्यात आपले अतिरिक्त वजन कमी करायचे. त्यानंतर बदली किंवा प्रतिनियुक्ती काहीही करण्यास ते तयार होतात. एका महिन्यात किमान १० किलो वजन कमी करण्याची त्यांची अट असते. अट पूर्ण केली तरच इच्छाही पूर्ण होईल, असे ते स्पष्टपणे बजावतात. बिजेंद्र सिंह नावाच्या जवानाने एका महिन्यात १३ किलो वजन कमी करून दाखवले होते. मेघवाल यांनी त्यास केवळ गौरवलेच नाही, तर त्याचा फोटोही आपल्या केबिनमध्ये लावला.

तयार केला २५,००० जवानांचा डेटा
डॉ. मेघवाल यांनी एमबीबीएस केले आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये राजस्थान फ्रंटियरच्या आयजी पदाचा पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी जवानांचा तपास केला. त्यात बीएमआयनुसार (बॉडी मास इंडेक्स) काही जवानांचे वजन अधिक असल्याचे दिसून आले. त्या वेळी मेघावाल यांनी २५ हजार जवान तसेच अधिकार्‍यांची पाहणी केली होती. त्यात १२ हजार अनफिट दिसून आले. तेव्हापासूनच त्यांनी फिटनेस मोहीम हाती घेतली.

डेप्युटेशनसाठी दर दिवशी १८ किमी सायकल
सहायक प्रशिक्षण केंद्रात तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल मोहनलाल मुलीचा विवाह करण्यासाठी जोधपूरमध्ये राहू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी आयजींना आग्रह केला. त्यांनाही वजन घटवण्याचे आव्हान देण्यात आले होते. मोहन यांनी दोन महिने सातत्याने दर दिवशी १८ किमी सायकल चालवणे, शीर्षासन केले आणि मर्यादित भोजन केले. त्यांनीही १३ किलो वजन कमी केले. त्यांची कंबर ४० हून ३४ वर आली. आयजींनी त्यांना १५ जूनला डेप्युटेशनमध्ये वाढ करून दिली.

रोल मॉडेल बिजेंद्रने बदलीसाठी केला विक्रम
सीमेवर तैनात असलेल्या बिजेंद्र सिंह याला कौटुंबिक कारणाने गंगानगर येथे बदली हवी होती. त्या वेळी त्याचे ९१ किलो वजन होते. एक महिन्यात त्याने आपले वजन ७८ किलो केले होते. त्यासाठी सायकलिंग, योग तसेच संयत डाएट करून त्याने वजन कमी केले होते. आयजींनी त्यास बदलीसह पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान केले होते.
बातम्या आणखी आहेत...