आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद‌्घाटनात महिला सक्षमीकरणाचा जयघोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री रमेश पारसेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, नाना पाटेकर, एस. पी. बालसुब्रमण्यम, मुकेश खन्ना आदी दिग्गजांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी गोव्याची राजधानी पणजीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात उद््घाटन सोहळा पार पडला. १९१३ पासून ते आतापर्यंत भारतीय चित्रपटांमधून दाखवण्यात आलेल्या महिलांच्या विविध गुणांचे संगीत आणि नृत्याच्या साथीने अनोख्या प्रकारे या वेळी सादरीकरण करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या जयघोषाने सभागृहातील वातावरणात ऊर्जा भरण्यात आली.

‘वंदे मातरम’ने भारावला सोहळा
गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी हा सुवर्णमहोत्सवी पुरस्कार त्यांच्या आई तसेच देशासाठी लढणाऱ्या जवानांना समर्पित केला. या वेळी भावना व्यक्त करताना प्रेक्षकांकडून गाण्याची फर्माइश सुरू झाली. दुसऱ्याच क्षणी बालसुब्रमण्यम यांनी ‘शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी’ या शब्दांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली आणि अवघ्या सभागृहात शांतता पसरली. अवघ्या काही क्षणांतच भारतमाता की जयचा जयघोष दुमदुमला.
बातम्या आणखी आहेत...