आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक अभिनेता, एक गायक ही भावना यापुढे कायम राहणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - पूर्वी एका अभिनेत्यासाठी बहुतांश चित्रपटांत एकच गायक गायन करायचा आणि दोघांची हीच ओळख होती. ती परंपरा मोहंमद रफी यांच्यापासून थेट माझ्यापर्यंत चालत आली होती. मात्र, सध्या एका अभिनेत्यासाठी एकाच गायकाचा आवाज कायम राहणे शक्य नाही, असे मत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी विशेष संवाद साधला.
गायनाच्या जागतिक गिनीज विक्रमाबद्दल काय सांगाल?
-बालसुब्रमण्यम : मी तामीळ गाण्यांनी माझ्या गायनकलेची सुरुवात केली. ती केवळ आनंद मिळवण्यासाठीची सुरुवात होती. हळूहळू ते कधी करिअर बनले कळलेच नाही. मात्र, पाच दशकांच्या काळात मी विविध भाषांमध्ये ४० हजारांहून अधिक गाणी गायली, यावर माझा विश्वासच बसत नाही. पण, आता याचा खूप अभिमान वाटतो. जागतिक गिनीज विक्रम हा या प्रवासातील एक टप्पा होता. तो या प्रवासाने आता पूर्ण केला.

संगीत क्षेत्रातील सध्याच्या नव्या परिवर्तनाबद्दल काय वाटते?
-बालसुब्रमण्यम : आधी आम्ही गीतकार, संगीतकारांच्या इशाऱ्यावर काम करायचो. त्यांनी गीत बनवणे आणि गायक या नात्याने माझ्यासारख्यांनी ते त्याचे गायन करणे इथपर्यंतच मर्यादित होतो. मात्र, या तिन्ही कला
एकत्र आल्याशिवाय कलाकृती बनत नाहीत. आता संगीत क्षेत्रात फार मोठे परिवर्तन झाले आहे. आता एकच व्यक्ती गीतकार, संगीतकार अन् गायकाचीही भूमिका बजावतो. रसिकही त्याच अंगाने बदलला असल्याने संगीताची व्याप्तीही बदलत
चालली आहे.

एका अभिनेत्यामागे एकाच गायकाचा आवाज, ही भावनाच लुप्त झाली आहे?
- बालसुब्रमण्यम : मोहंमद रफी-देव आनंद, किशोर कुमार-शम्मी कपूर किंवा मी आणि सलमान खान अशी काही काळ आधी जोडी होती. सलमानच्या बहुतांश चित्रपटांमध्ये मी पार्श्वगायन केल्याने आमची अगदी अभिनय-गायनाची वेगळीच गट्टी जमून आली होती. पण, आता चित्रपट क्षेत्रात रोज अनेक गायक येत आहेत. प्रत्येकाची नवी शैली आहे. प्रेक्षकांनाही रोज नवीन हवे आहे. शिवाय, नवे गायक किंवा अनेक नवीन अभिनेते जास्त दिवस तग धरून राहत नसल्याने पूर्वीसारखे शक्य नाही. मात्र, नवे प्रयोग होत असल्याने रसिकांना अनेक बहारदार कलाकृती मिळत आहेत, हे खूप छान होत आहे.

तुम्ही सत्तरी गाठलीय, यापुढे काय योजना?
बालसुब्रमण्यम : माझे वय कितीही होवो, माझी संगीताची साधना कायमच राहील. गायक, संगीतकार आणि निर्माता म्हणून मी हिंदी, तामीळ, कन्नड तसेच अन्य भारतीय भाषांमध्ये यापुढेही सक्रिय असेन. केवळ वय झाले म्हणून कारकीर्दीला विराम द्यायचे, असे मला वाटत नाही. काही नव्या दम्याच्या गायक, कलाकारांसोबत काम करायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...