आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIM Students Will Trinamool Congress Party Internship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयएमचे विद्यार्थी करणार तृणमूल काँग्रेसची इंटर्नशिप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- डाव्यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकणार्‍या तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी यासाठी कोलकात्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयएम) 31 विद्यार्थ्यांनी या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘वॉररूम’मध्ये प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
31 विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन विद्यार्थ्यांची दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड केली असून 15 मार्चपासून त्यास सुरुवात होईल, अशी माहिती तृणमूलचे खासदार आणि प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. इंटर्नशिपच्या आवाहनास विद्यार्थ्यांनी तुफान प्रतिसाद दिला. आम्ही शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते, मात्र, पहिल्या वर्षातील 17 विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणामध्ये रस दाखवला.शेवटच्या वर्षातील 14 जणांची निवड करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीतून विद्यार्थ्यांना संवादाची चांगली रणनीती बनवण्यास मदत मिळेल. पक्षाच्या पाच सदस्यांनी आयोजित केलेल्या ग्रुप डिस्कशनमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. निवड झालेले विद्यार्थी तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यालयात संपर्क पथकासोबत तसेच अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसचे युवा अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत काम करतील. इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना संपर्क व्यवस्थेची रणनीती, सोशल मीडिया कौशल्यात सुधारणा तसेच निधीविषयक कामे सोपवली जातील. 2011 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी पक्षाने हरिहरण श्रीराम आणि मन्शा टंडन यांनी इंटर्नशिप दिली होती. कोणताही राजकीय पक्ष एखाद्या औद्योगिक संस्थेसारखे आहे, हा माझा अनुभव आहे. नेतृत्वाच्या प्रत्येक निर्णयावर लाखो लोकांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव असतो. या दबावातून त्यांना मोठपण मिळते, असे टंडनने सांगितले.