मेरठ - विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) च्या नेत्या साध्वी प्राची यांना मंगळवारी रात्री उशीरा जखमी अवस्थेत मेरठच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बरेलीच्या शेरगडला एका कार्यक्रमासाठी जात असताना पोलिसांनी अचानक हल्ला चढवल्याचा आरोप साध्वी यांनी केला आहे. मंत्री आजम खान यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोपही साध्वी प्राची यांनी केला. बुधवार सकाळी प्राची यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सध्या या मुद्यावर सरकारने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
साध्वीचा आरोप
विहिंपचे काही कार्यकर्ते मंगळवारी रात्री उशीरा साध्वी प्राची यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेले. प्राची यांनी सांगितले की, मी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालले होते. माझ्याबरोबर काही साधुही होते. आम्ही जात होतो त्या गावात छेडछाडीला कंटाळून सुमारे 150 मुलींनी शिक्षण सोडले आहे. पण रस्त्यातच पोलिसांनी आम्हाला अटक केली आम्हाला मारहाण केली. पोलिसांनी हा हल्ला यूपी सरकारचे मंत्री आजम खान यांच्या इशाऱ्यावरून केला, असा आरोपही साध्वी प्राची यांनी केला आहे. आम्हाला जामिनावर सोडण्याआधी धमकी देण्यात आली की, जर आम्ही या कार्यक्रमात (महापंचायत) सहभागी झालो तर आम्हाला, बाकी आयुष्य तुरुंगातच राहावे लागेल. दरम्यान, डॉक्टरांनी साध्वी यांचे रिपोर्ट आल्यानंतरच काहीही बोलता येईल असे म्हटले आहे.
हिंदु संघटनांचा गदारोळ
दरम्यान, हिंदु संघटनांनी मंगळवारील रात्री आणि बुधवारी सकाळी रुग्णालयात जाऊन चांगलाच गोंधळ घातला. प्राची यांचे समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात त्यांना पाहायला जात आहेत. काही समर्थकांनी रस्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला.
पुढे पाहा, संबंधित फोटो...