आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIT Admission News In Marathi, T 20 Persantile, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटी प्रवेशासाठी १२ वी बोर्डाचे गुण ग्राह्य; टॉप-२० पर्सेंटाइलची अट शिथील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता आयआयटी प्रवेशासाठी इयत्ता १२ वीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. आयआयटी मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार आता टॉप-२० पर्सेंटाइल शिवाय विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुणही ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ विकास सचिव अशोक ठाकूर यांनी दिली.

मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मंडळाच्या बैठकीत हा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय झाला.

सध्याचा नियम
सध्या जे विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेत टॉप-२० पर्सेन्टाइलमध्ये आहेत. त्यांनाच जेईईनंतर देशातील १६ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेशाची संधी मिळते. मात्र जेईईमध्ये चांगले गुण मिळवूनही केवळ टॉप-२० पर्सेंटाइलमध्ये नसल्याने २०० विद्यार्थी आयआयटी प्रवेशापासून वंचित राहतात.

नव्या नियमामुळे नेमके काय होणार?
नव्या नियमानुसार जे विद्यार्थी टॉप-२० पर्सेंटाइलमध्ये अशा विद्यार्थ्यांना मंडळाने निर्धारित केलेले किमान गुण असतील तर आयआयटी प्रवेशाची संधी मिळणार आहे.
नव्या नियमानुसार सर्वसाधारण तसेच इतर मागासवर्ग (ओबीसी) संवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण तर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्‍यांना १२ वी बोर्ड परीक्षेत ७० टक्के गुण आवश्यक आहे. या सर्व विद्यार्थ्याना जेईई उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

का भासली गरज?
ज्या बोर्डांत स्कोअरिंग जास्त आहे ते विद्यार्थीही टॉप-२० पर्सेंटाइलमध्ये येत नव्हते. याच वर्षी २४० विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये उत्तीर्ण झाले मात्र राज्य बोर्डाच्या टॉप-२० पर्सेंटाइलमध्ये नव्हते. यामुळे त्यांना आयआयटीत प्रवेश मिळाला नव्हता. विशेष म्हणजे, जेईई लागू होण्याच्या आधी (२०१३) आयआयटी प्रवेशासाठी १२ वी बोर्डात किमान ६०% गुण मिळवणे आवश्यक होते.