आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी घेतली 45 दिवस नोकरी-धंद्यातून सुटी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- राजीवनगरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या प्रवेश खिडकीवर लागलेल्या लांबच लांब रांगेत जबलपूर येथील रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक राजेश पाठकही उभे आहेत. त्यांना मुलासाठी युनिफॉर्म घ्यायचा आहे. मुलगा राहुलच्या करिअरसाठी छत्तीसगडमधील कोरियाहून आलेले महेशकुमार आपला व्यापार बंद करूनच आले आहेत. 45 दिवसांचा जेईई-अ‍ॅडव्हान्स क्रॅश कोर्स पूर्ण करूनच ते परतणार आहेत. रविप्रकाश हे उत्तर प्रदेशातील रेनुकूटमध्ये (सोनभद्र) हिंदाल्को कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत. त्यांच्या पत्नीच्या हातात अटॅची आहे. त्या मुलगी प्रज्ञाचा फॉर्म जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत. आग्र्‍याचे व्यापारी राजेंद्र शर्मा हायस्कूल परीक्षेनंतर मुलगा उत्सवच्या पीएमटी कोचिंगसाठी आले आहेत. ते सर्व व्यवहार फोनवरूनच करत आहेत. मुलाच्या देखभालीसाठी आई रंजनाही त्याच्यासोबतच राहणार आहे. शहडोल येथील कोल इंडिया लिमिटेडचे डेप्युटी जीएम प्रदीपकुमार थांबू शकले नाहीत. त्यामुळे ते परतल्यानंतर कुठे कोणती मदत मिळेल, याच्या सूचना मुलगी आयुषीला देत आहेत.
राजीवनगरमध्ये कोणत्याही वेळी कोचिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तच असते. एकीकडे एखाद्या विद्यापीठासारख्या क्लासेसच्या बहुमजली इमारती आहेत, तर दुसरीकडे हॉटेलसारखी वसतिगृहे. सकाळी 8 वाजताची वेळ. गल्लीत नजर टाकावी तिकडे विद्यार्थीच विद्यार्थी नजरेस पडतात. त्यांच्यासोबत पालकही. त्यांची बॅग, अटॅची, पाण्याची बाटली हातात घेऊन. आयआयटीच्या 10 हजार जागांसाठी 2 जून रोजी होणार्‍या प्रवेश परीक्षेसाठी या वेळी देशातील 1.50 लाख विद्यार्थ्यांत स्पर्धा आहे. मुलांसाठी अनेक पालक दीड महिना सर्व कामधंदा सोडून येथेच तळ ठोकून बसले आहेत. सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची लगबग पाहायला मिळते. मुलांसाठी कोचिंग, होस्टेल, मेस, सायकल, स्टेशनरी, बिछाना आदींचा बंदोबस्त. एका कोचिंग क्लासने तर मुलांसाठी राहणार्‍या आर्इंसाठी हॉबी क्लासच सुरू केला आहे.

महानगरे स्टुडंट फ्रेंडली नाहीत
विज्ञाननगरजवळच्या परिसरात पाच मोठ्या कोचिंग संस्था आहेत. येथे शिकणार्‍या मुलांना रस्ता सहज पार करता यावा म्हणून 7 कोटी रुपये खर्चून मिनी ओव्हरब्रिज उभारण्यात आला आहे. पठाणकोट येथून आलेले सीबीआयचे उपअधीक्षक रवींद्र ठाकूर येथील एका संस्थेत बसले आहेत. त्यांच्या मते दिल्ली, चंदिगडसारख्या शहरांमध्ये असे वातावरणच नाही. शिकवण्याचा दर्जा दिल्ली-मुंबईतही चांगला आहे, पण मेट्रो सिटीमध्ये स्टुडंट फ्रेंडली वातावरण नाही.

प्रवासखर्च 1 लाख, शुल्क 20 हजार
आयबीएम बंगळुरूचे व्यवस्थापक अनिल आराध्ये यांनी मुलगा विजेथच्या केव्हीपीवायसाठी जवाहरनगरच्या संस्थेत प्रवेश दिला. प्रथम ते विमानाने जयपूरला आले, या वेळी ते थेट झाशीपर्यंत आले. तेथून रेल्वेने यावे लागले. दोन वेळचा प्रवास खर्च1 लाख रुपये झाला. कोचिंगची फी 2000 रुपये आहे.