कोलकाता/कोटा - देशभरातील 16 आयआयटी संस्थांसह आयएसएम-धनबादमध्ये प्रवेशासाठी जेईई-अॅडव्हान्सचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. उदयपूरचा चित्रांग मुरदिया (दिल्ली झोन) देशातून पहिला आला आहे. मुलींत जालंधरची अदिती पहिली आली. कॉमन मेरिट लिस्टमध्ये तिला 7 वे स्थान मिळाले असून, ती रुरकी झोनची आहे. गेल्या वेळच्या टॉपरचे नावही अदितीच होते. टॉप 100 मध्ये केवळ पाचच मुली आहेत. जेईई मेनच्या आधारे 1.54 लाख विद्यार्थ्यांची अॅडव्हान्ससाठी निवड झाली होती. त्यातील 1 लाख 26 हजार 997 जणांनी परीक्षा दिली. एकूण 9,784 जागांसाठी 27 हजार 151 विद्यार्थी पात्र ठरले. यंदा टॉपर्सच्या गुणांची टक्केवारीही वाढली आहे. गतवेळी टॉपरला 332 गुण होते. या वेळी चित्रांगला 334 गुण मिळाले आहेत.
तणावमुक्त राहिल्याने यश : चित्रांग
चित्रांग मुरदिया रँक - 1
(गुण 334/360)
शहर : उदयपूर (राजस्थान)
वडील : मनीष, उद्योजक आई : सोनाली, गृहिणी
सीबीएसई 12वीत 97 टक्के गुण होते. टेन्शन न घेता अभ्यास एन्जॉय केला. कॉर्पोरेट जॉबऐवजी संशोधन करायचे आहे.- चित्रांग मुरदिया
पुढे वाचा...