आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीत वैद्यक-अभियांत्रिकीची सांगड, खरगपूरमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - अभियांत्रिकी क्षेत्रात प्रख्यात आयआयटी खरगपूरमध्ये आता अभियंत्यांसोबतच डॉक्टरही घडवले जातील. खरगपूर आयआयटी ही एमबीबीएससारखे वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणारी पहिलीच आयआयटी ठरणार आहे. वैद्यकीय-अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही शाखांची सांगड शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात घातली जाणार आहे.

आयआयटी खरगपूरचे संचालक पार्थ प्रतिम चक्रवर्ती म्हणाले, केंद्राने गतवर्षी २३० कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली होती. एमबीबीएससारख्या वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेला (एमसीआय) मंजुरी मागितली आहे.

मेडिकलमध्ये इंजिनिअरिंगचा वापर
रुग्णालय टेलिमेडिसिन आणि टेलिरेडिओलॉजीसारख्या तंत्रज्ञानाचा वापरण्याची योजना आखत आहे. बायोमेडिकल, क्लिनिकल, ट्रान्सलेशनल संशोधनावरही काम होईल. औषधांचे डिझाइन व त्यांच्या पुरवठ्यावरही संशोधन केले जाईल. सोबतच पॅरामेडिक, नर्सिंग प्रशिक्षण संस्था बायोमेडिकल इनोव्हेशनसारखे प्रकल्पही राबवले जाईल.

आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य
अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आणि लंडनच्या प्रतिष्ठित इम्पिरिअल कॉलेजकडून वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत सहकार्य घेतले जात आहे.

आधीपासून अभ्यासक्रम
खरगपूर २००१ पासून वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवत आहे. आयआयटीच्या अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी परिसरात ३२ खाटांचे बी.सी. रॉय टेक्नॉलॉजी रुग्णालय आहे. त्यात आयसीयू व आयसोलेशन वॉर्डही आहे.
बातम्या आणखी आहेत...