आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळनंतर आता IIT मद्रासमध्ये बीफ फेस्टिव्हल; केंद्र सरकारच्या नव्या कायद्याचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - केरळनंतर IIT मद्रास येथील 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी सुद्धा बीफ फेस्ट आयोजित केला. कत्तलखान्यांसाठी प्राण्यांची खरेदी विक्री बंद करणारा कायदा केंद्र सरकारने नुकताच पास केला. त्याच कायद्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. तत्पूर्वी केरळमध्ये शनिवारी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने आपल्या 16 कार्यकर्त्यांसह बीफ फेस्ट आयोजित केला होता. त्या सर्वांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तसेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्या काँग्रेसींचा निषेध केला.
 
केरळात ठिक-ठिकाणी बीफ फेस्ट
- कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणणाऱ्या कायद्याचा केरळमध्ये तीव्र विरोध आणि ठिक-ठिकाणी बीफ फेस्ट आयोजित करण्यात आला. 
- केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ आणि यूडीएफ ने सरकारविरोधात आंदोलन केले. दोन्ही पक्षांच्या युथ ब्रिगेडने बीफ फेस्टिव्हल आयोजित केले. 
- यात स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने शनिवारी त्रिवेंद्रम येथे विद्यापीठासमोर बीफ पार्टी केली. 
 
काँग्रेस कार्यकर्ते निलंबित
- केरळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बीफ फेस्टचा राहुल गांधी यांनी निषेध केला. "केरळात शनिवार जे काही झाले, तो निव्वळ मूर्खपणा होता. मी किंवा काँग्रेस असले प्रकार खपवून घेणार नाही." 
- यानंतर केरळातील युवक काँग्रेस अध्यक्षासह 16 जणांना पक्षाने निलंबित केले. 
बातम्या आणखी आहेत...