आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Aset Of Jayalalitha Case Jugdement Come Out Today, Divya Marathi

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा आज निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. बंगळुरूच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मायकल डिकुन्हा त्यावर आपला फैसला सुनावतील. १८ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात जयललिता यांच्याशिवाय अन्य तीन सहआरोपी आहेत.
त्यात जयललिता यांची सहकारी शशिकला, पुतणी इला वारसी, पुतण्या सुधाकरन यांचा समावेश आहे. विशेष न्यायालय पराप्पना अग्रहारा तुरुंग परिसरात लावले जाईल. हायप्रोफाइल खटला असल्याने पाच टप्प्यांत सुरक्षा ठेवण्यात आली आहे.