आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिलासा, अटक टाळून सुनावणी पुढे ढकलली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - 35 हजार कोटींच्या खाण घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बेकायदा खाण घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी पणजी भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात सुनावणी झाली. विशेष तपास पथकाने आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ मागून घेतला आहे. 
 
राज्यातील 35 हजार कोटी रूपयांचा खाण घोटाळा निवृत्त न्यायाधिश एम.बी.शहा यांनी उघड केला होता. राज्य सरकारतर्फे विशेष तपास पथकामार्फत या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. कामत यांच्या अटकपूर्व जामीनावर पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. 
 
कामतांना 10 दिवसांचा दिलासा..
दिगंबर कामत यांनी अटक टाळण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांना अटक करू नये असे सांगून न्यायालयाने सुनावणी सुरू केली. त्यामुळे कामत यांना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. 
 
35 हजार कोटींचा घोटाळा                 
केंद्र सरकारने एम.बी.शहा आयोगाची स्थापना करून खाण घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यातून गोव्यात 35 हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आकडा बाहेर आला होता.
 
कोण आहेत कामत 
दिगंबर कामत हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आहेत. गोव्याचे खाण खाते 10 वर्षे त्यांच्याकडे होते. 
बातम्या आणखी आहेत...