आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Weapons Case: Salaman Khan's Judgment On 25 February

अवैध शस्त्रे प्रकरण: सलमानचा निकाल २५ रोजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अभिनेता सलमान खानच्या विरोधात १६ वर्षे जुन्या अवैध शस्त्रे बाळगल्याच्या प्रकरणात येथील सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून सलमानच्या शिक्षेबाबत २५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात निकाल देणार आहे.

सलमान खानच्या विरोधात १ व २ ऑक्टोबर १९९८ रोजी स्वत:जवळ अवैध शस्त्रे बाळगल्याचा व त्याचा वापर काळविटांच्या शिकारीसाठी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १६ साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले.