आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Work In Jodhpur Jail Dainik Bhaskar Open Scam

या तुरुंगात कैद आहे आसाराम, चिरीमिरी घेऊन पोलिसच कैद्यांना पुरवतात दारु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक संत आसाराम बापू जोधपूर मध्यवर्ती तुरुंगाची हवा खात आहे. जोधपूर येथील मध्यवर्ती तुरुंग हे देशातील हाय सेक्युरिटी असलेले एक तुरुंग आहे. मात्र, येथे पैशाच्या जोरावर कैदी येथे ऐशोआरामात राहातात. पोलिसांना चिरीमिरी दिल्यास कैद्यापर्यंत मोबाइल शिवाय दारुही सहच पोहोचवली जाते, असा धक्कादायक भांडाफोड आमची सहयोगी वेबसाइट dainikbhaskar.com ने केला आहे.

तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या काही कैद्यांनी सांगितले की, जोधपूर तुरुंगाच्या अधिकार्‍यांचा खिसा गरम गेल्यानंतर तुरुंगात दारु-सिगरेट-पान मसाला सहज पोहोचतो. तुरुंगातील कैदी खुलेआम मोबाइल हातळतात. इतकेच नव्हे तर तुरुंगात कैद्यांना व्हीआयपी सुविधा दिल्या जातात. सध्या जोधपूर तुरुंगात आसाराम यांच्यासारखे हायप्रोफाइल कैदी तसेच अफगानिस्तानातील काही दहशतवाद्यांसह एकूण 1300 कैदी आहेत.

असा झाला खुलासा...
काही दिवसांपूर्वी जोधपूर तुरुंगात कैद असलेल्या एका कैद्याने स्वत:ला मारहाण होत असतानाचा एक व्हिडिओ वॉट्सअॅपच्या माध्यमातून मित्राला पाठवला होता. या व्हिडिओमध्ये कैद्याला अमानुष मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे dainikbhaskar.com ने छानबिन केल्यानंतर तुरुंगातील अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

जोधपूर तुरुंगात राहून अट्टल गुन्हेगार आपली गँग ऑपरेट करत आहेत. सोबत असलेल्या कैद्यांना ते अमानुष मारहाण करतात. परंतु तुरुंग प्रशासन मुग गिळून बसते. तुरुंगातील कैद्यांना सर्व प्रकारच्या सुविधा सहजपणे उपलब्ध होत असतात. यासाठी आधी पोलिसांचे खिसे हिरव्या नोटांनी गरम करावे लागतात, असे नाव न जाहीर करण्‍याच्या अटीवर तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या एका कैद्याने सांगितले आहे.

कैदी तुरुंगात तैनात असलेल्या पोलिस अधिकार्‍यांना आपल्या दैनंदिन गरजा सांगतात. त्याबदल्यात पोलिस मोठी रक्कम बसूल करतात. तुरुंगात एखादी वस्तू पाठवण्यासाठी गेटवर तैनात असलेल्या पोलिस कॉन्टस्टेबलची भूमिका महत्त्वाची असते. कैद्याला एखादी वस्तू पुरवण्यासाठी तो दुप्पट-तिप्पट रक्कम वसूल करतो. वस्तू कैद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांची एक साखळी असल्याची माहिती मिळाली आहे.
कैदी तुरुंगात तैनात असलेल्या पोलिस अधिकार्‍यांना आपल्या दैनंदिन गरजा सांगतात. त्याबदल्यात पोलिस मोठी रक्कम बसूल करतात. तुरुंगात एखादी वस्तू पाठवण्यासाठी गेटवर तैनात असलेल्या पोलिस कॉन्टस्टेबलची भूमिका महत्त्वाची असते. कैद्याला एखादी वस्तू पुरवण्यासाठी तो दुप्पट-तिप्पट रक्कम वसूल करतो. वस्तू कैद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांची एक साखळी असल्याची माहिती मिळाली आहे.

जोधपूर तुरुंगात दारुची बाटली पोहोचवण्याच्या बदल्यात दारुच्या किमतीच्या पाच पट रक्कम वसूल केली जाते. जास्त करून एकाच ब्रँडची दारु तुरुंगात पोहोचवली जाते. तसेच तुरुंगात मोबाइल फोन वापरण्यासाठी कैद्यांकडून तीन ते पाच हजार रुपये वसूल केले जातात. कैद्यांना मोबाइलवरुन त्यांच्या कुटूंबियांशी बोलू दिले जाते.

दरम्यान, आसाराम बापू 2013 पासून जोधपूर तुरुंगात कैद आहेत. आश्रमातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आसाराम यांच्यावर आरोप आहे. आतापर्यंत आसाराम यांना जामीन मिळालेला नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, वॉट्सअॅपच्या मदतीने कैद्याने तुरुंगातून मित्राला पाठवलेला व्हिडिओ...
(Photos: एल देव जांगिड)