आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादानंतर इरफान म्हणाला- \'सुदैवी आहे धर्माच्या ठेकेदारांच्या राज्यात राहात नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफानने जयपूरमध्ये  ईद-उल-जुहा संदर्भात वादग्रस्त स्टेटमेंट केले. - Divya Marathi
इरफानने जयपूरमध्ये ईद-उल-जुहा संदर्भात वादग्रस्त स्टेटमेंट केले.
जयपूर (राजस्थान) - अभिनेता इरफान खान याने 'कुर्बानी'वर व्यक्त केलेल्या मतामुळे सुरु झालेला वाद काही थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी इरफानने धर्मगुरुंना फैलावर घेतले. त्याने सोशल प्लॅटफॉर्म फेसबुकवर लिहिले, 'मी धर्मगुरुंना घाबरत नाही. मी खुदाचा आभारी आहे की मी अशा देशात राहातो जिथे धर्माच्या ठेकेदारांचे राज्य नाही. माझी विनंती आहे की जे माझ्या वक्तव्याने दुःखी झाले आहेत त्यांची आत्मपरीक्षण करण्याची तयारी नाही. किंवा ते फारच घाईत निवाडा करत आहेत.'

इरफानच्या कोणत्या वक्तव्याने निर्माण झाली कॉन्ट्रव्हर्सी
- 29 जून रोजी इरफान त्याचा आगामी चित्रपट मदारीच्या प्रमोशनसाठी जयपूरला आला होता.
- यावेळी त्याने ईद-उल-जुहा संदर्भात वादग्रस्त स्टेटमेंट केले. तो म्हणाला, 'कुर्बानीचा अर्थ, तुम्हाला जे सर्वाधिक जवळचं आहे ते कुर्बान करणे आहे. बाजारातून दोन बकरे खरेदी करुन आणायचे आणि त्यांची कुर्बानी द्यायची, असा त्याचा अर्थ नाही.'
- इरफान केवळ तेवढ्यावरच थांबला नाही तर तो म्हणाला, 'तुमचा त्या बकऱ्यांशी काही संबंधच नाही तर त्यांची कुर्बानी देण्याला काय अर्थ ? त्यातून कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारावा की कोणाचे प्राण घेऊन तुम्हाला कसे पुण्य लाभेल ?'
- चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला अभिनेता इरफान म्हणाला, 'आपले जेवढे सण आहेत त्यांचा अर्थ आपण नव्याने समजून घेतला पाहिजे. ते कशासाठी साजरे केले जातात हे जाणून घेतले पाहिजे. आपले सौभाग्य आहे की आपण अशा देशात राहोत जिथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो.'
धर्मगुरु भडकले
- इरफानच्या वक्तव्याने काही धर्मगुरु भडकले आहेत. मुफ्ती अखलाकुर्रहमान कासमी म्हणाले, 'इरफानने जे काही सांगितले ते कुरणाच्या विरोधातील आहे.'
- जामा मशिदचे माजी सचिव अनवर शाह म्हणाले, 'इऱफानने असे स्टेटमेंट करण्यापूर्वी इस्लामचा अभ्यास करायला हवा होता.'
- एकीकडे काही धर्मगुरु विरोधात गेले असताना सोशल मीडियावर काहींनी इरफानला पाठिंबा दिला आहे.
- पीयूष दीक्षितने लिहिले आहे, की हे सर्व धर्मांनाच लागू होते. धर्माच्या नावावर देशाला वेठीस धरले जात आहे.
- अतहर आलमने लिहिले, 'मी इरफानचा समर्थक आहे. कुर्बानीची प्रथा कशी सुरु झाली हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सलमानबद्दल काय म्हणाला होता इरफान...
बातम्या आणखी आहेत...