नवी दिल्ली- हवामान खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये 1 जून ते आतापर्यंत साधारणपणे 41 टक्के कमी पाऊस पडला आहे. 'स्कायमेट'च्या अहवालानुसार मागील 10 वर्षांमध्ये जूनमध्ये एवढ्या कमी प्रमाणात पाऊस पडला नाही, यामुळे देशातील अनेक राज्य दुष्काळाच्या छायेत आहेत. याचा परिणाम थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मान्सूनबद्दल अशाही काही गोष्टी आहेत, ज्या अनेक लोकांना माहित नाहीत. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीबाबत माहिती देणार आहोत. तसेच मागील 10 वर्षांमध्ये मान्सूनचे उत्पादन आणि जीडीपीवर काय परिणाम पडला....
तुम्हाला माहित आहे का?
=> जगातील सर्वात पहिला मान्सून अंदाज 4 जून 1886 ला एच. एफ. ब्लॅनफोर्ड यांनी दिला होता.
=> 1901 पासून ते आतापर्यंतचा सर्वात जास्त दक्षिण पश्चिम मान्सून पाऊस 1917 मध्ये पडला. ज्याचे प्रमाण 122.9 टक्के एवढे होते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा... मान्सूनबद्दलच्या काही खास निष्कर्ष....